शनिवारी ३४४ बाधित, तर २८३ झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:25+5:302021-07-04T04:08:25+5:30
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात ३४४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू ...
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात ३४४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ८०२ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वॅब तपासणी केंद्रांवर ६ हजार ७३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.२ टक्के होती. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्याबाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील शनिवारचा मृत्यूदर हा १.८ टक्के इतका आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९१ रुग्ण गंभीर असून ४३२ ऑाक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ८७ हजार ८७४ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७९ हजार ४१६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६८ हजार ८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------