गरवारे महाविद्यालयात बंदाेबस्तात सत्यनारायण पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:26 PM2018-09-05T15:26:52+5:302018-09-05T15:28:25+5:30

फर्ग्युसनमध्ये अायाेजित केलेल्या सत्यनारायण पुजेमुळे झालेला वाद ताजा असतानाच अाता गरवारे महाविद्यालयात सत्यनारायण पुजेचे अायाेजन करण्यात अाले हाेते.

satyanarayan pooja in security at garware college | गरवारे महाविद्यालयात बंदाेबस्तात सत्यनारायण पूजा

गरवारे महाविद्यालयात बंदाेबस्तात सत्यनारायण पूजा

Next

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पुजेमुळे माेठा वाद निर्माण झाला असताना अाता अाबासाहेब गरवारे महाविद्यालयातही खासगी बंदाेबस्तात सत्यनारायण पुजेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या पुजेलाही काही विद्यार्थी संघटनांनी विराेध दर्शवला असता तरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संस्थेकडे सत्यनारायण पुजेसाठी जागेची मागणी केली असल्याने संस्थेने या पुजेस परवानगी दिले असल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मुक्तजा मठकरी यांनी दिले अाहे. त्याचबराेबर इतर धार्मिक सण साजरे करण्यास विद्यार्थ्यांनी परवानगी मागितल्यास ती देण्याची तयारी असल्याचे संस्थेने सांगितले असल्याचे मठकरी यांनी सांगितले. 

    फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी अायाेजित केलेल्या सत्यनारायण पुजेमुळे वाद निर्माण झाला हाेता. काही पुराेगामी विद्यार्थी संघटनांनी या पुजेला कडाडून विराेध केला हाेता. त्यानंतर अाता गरवारे महाविद्यालयात सत्यनारायण पुजेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या पुजेसाठी परवानगी मागितली हाेती. प्राचार्या मठकरी यांनी याबाबत संस्थेला निर्णय घेण्याची विनंती केली हाेती. याबाबतचे पत्र मठकरी यांनी 27 अाॅगस्ट राेजी संस्थेला लिहीले हाेते. त्याचे उत्तर यायच्या अाधीच शिक्षकेतर संघटनेने संस्थेला पत्र लिहीत पुजेसाठी परवानगी मागितली. त्यासाठी डाेनेशनही देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर अाज महाविद्यालयाच्या अाॅडिअाे व्हिज्युअल हाॅलमध्ये ही पूजा पार पडली. या पुजेला विराेध करण्यासाठी अालाे असता महाविद्यालयात प्रवेश दिला नाही, परंतु पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना अात जाऊ दिले असा अारेप लाेकतांत्रिक दनता दलाचे प्रदेश सरचिटणीस  कुलदीप अांबेकर यांनी केला. 

    या प्रकरणी प्राचार्या मठकरी यांनी एक पत्रक काढले असून त्यात अापली भूमिका स्पष्ट केली अाहे. शिक्षकेतर संघटनेनी संस्थेकडे ए. व्ही हाॅल मध्ये सत्यनारायण पूजा करण्यासाठी 31 अाॅगस्ट राेजी परवानगी माहितली हाेती. ही परवानगी देणे हा पूर्णपणे संस्थेच्या अखत्यारितला विषय अाहे. तशी परवानगी दिल्याचे संस्थेचे कार्यकारी अधिकारी अांबर्डेकर यांनी काल संध्याकाळी मला कळवले व मी त्यांच्या निराेप शिक्षकेतर कर्मचाऱ्याना दिला. या कर्मचाऱ्यांनी संस्थेस काही रक्कम डाेनेशन म्हणूनही दिल्याचे मला माहीत अाहे. असे मठकरी यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले अाहे. 

Web Title: satyanarayan pooja in security at garware college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.