सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने सरोद वादक अयान अली बंगश यांनी विमान कंपनीविरोधात व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:27 PM2018-04-20T22:27:57+5:302018-04-20T22:27:57+5:30

पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान सामान दुसरीकडे ठेवताना सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबददल  प्रसिद्ध सरोदवादक अयान अली बंगश यांनी खासगी विमान कंपनीविरूद्ध नाराजी व्यक्त केली.

Saurad player Ayan Ali Bangshad expressed his anger against the airline after handling the sarod incorrectly | सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने सरोद वादक अयान अली बंगश यांनी विमान कंपनीविरोधात व्यक्त केली नाराजी

सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने सरोद वादक अयान अली बंगश यांनी विमान कंपनीविरोधात व्यक्त केली नाराजी

Next

पुणे - पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान सामान दुसरीकडे ठेवताना सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबददल  प्रसिद्ध सरोदवादक अयान अली बंगश यांनी खासगी विमान कंपनीविरूद्ध नाराजी व्यक्त केली. त्यासंबंधी त्यांनी ट्ट्विटरवर मेसेज टाकून भावनांना वाट मोकळी करून दिली.
पुण्यात गुरूवारी डॉ. प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात येणा-या पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सरोदवादक उस्ताद
अमजद अली खान यांच्यासह ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया उपस्थित होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी उस्ताद अमजद अली खान यांच्यासमवेत त्यांचे पुत्र अयान अली बंग देखील आले होते. शुक्रवारी सकाळी 11.12 वाजता ते एका खासगी कंपनीच्या विमानातून पुणे ते दिल्ली असा प्रवास करीत होते. अयान हे विमानाच्या खिडकीच्या बाजूला बसले होते. त्यांना लांबून त्यांची सरोद जिथे सामान ठेवतात तिथे एका बँगेवर ठेवण्यात आली होती. सरोद हे वाद्य हाताळण्यास नाजूक असल्याने ते योग्य ठिकाणी ठेवले जावे अशी विनंती त्यांनी कर्मचा-यांना केली होती. मात्र सांगूनही त्यांनी सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने अयान यांनी नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले. मात्र काही तासातच ट्विट काढून टाकण्यात आले.

Web Title: Saurad player Ayan Ali Bangshad expressed his anger against the airline after handling the sarod incorrectly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.