सासवडला घनकचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

By admin | Published: November 25, 2015 12:57 AM2015-11-25T00:57:31+5:302015-11-25T00:57:31+5:30

घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला सासवड नगरपालिकेने मान्यता दिली. भारत सरकारचा उपक्रम, जर्मन तंत्रज्ञान आणि वनराई संस्थेचे मार्गदर्शन यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे.

Sausavad will be solid waste generation | सासवडला घनकचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

सासवडला घनकचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

Next

सासवड : घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला सासवड नगरपालिकेने मान्यता दिली. भारत सरकारचा उपक्रम, जर्मन तंत्रज्ञान आणि वनराई संस्थेचे मार्गदर्शन यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. जर्मन शास्त्रज्ञ, तसेच वनराईचे अधिकारी व नगरपालिका पदाधिकारी यांच्यामध्ये मंगळवारी नगरपालिका सभागृहात चर्चा झाली. त्यामध्ये हा प्रकल्प उभा करण्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी होकार दर्शविला.
घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पास कमी जागा लागणार असून, त्यापासून कोणतेही प्रदूषण होणार नाही, अशी माहिती वनराईचे रवींद्र मेहेंदळे यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, जर्मनीमध्ये असे अनेक प्रकल्प सुरू असून, भारतामध्ये नगरपालिका क्षेत्रात सासवड येथे देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प उभा राहू शकतो. यासाठी वार्षिक ५ हजार टन कचऱ्याची आवश्यकता असते. याठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करण्याची आवश्यकता नसते, तसेच माती, सिमेंटचे, दवाखान्याचा कचरा यांचेही विघटन होते, तसेच इंधनाचा खर्चही फार येत नाही. एक वर्षाच्या कालावधीत ३४० दिवस प्रकल्प सुरू राहतो. यावेळी प्रकल्पाची अधिक माहिती देताना एस. एम. काळे यांनी सांगितले की, हा प्रकल्प ७० कोटी रुपयांचा असून सर्व खर्च संबंधित कंपनी करणार आहे. नगरपालिकेने जागा, रस्ते, वीज आणि पाणी अशा पायाभूत सोयी द्यायच्या आहेत.
याप्रसंगी जर्मन शास्त्रज्ञ वोल्फर्ग्यांड फुलर, कार्यकारी अधिकारी मिस्टर हेल्मट, अभियंता मिस्टर इंगो, समन्वयक जर्नल सिंग यांसह माजी आमदार चंदुकाका जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेविका वसुधा आनंदे, नगरसेवक प्रमोद जगताप, अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, डॉ राजेश दळवी, योगेश गिरमे, यशवंत भांडवलकर, सचिन भोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, सुरेश रणपिसे यांसह विभागप्रमुख प्रमिला सरवदे, ज्ञानेश्वर गिरमे, मोहन चव्हाण, संजय पवार, प्रवीण जगताप, रंजना दुगार्डे, अभियंता प्रभाकर करपे, अमृता देशमुख, रामानंद कळसकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sausavad will be solid waste generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.