पहिल्या मजल्यावरून पडल्याने कवटी फॅक्चर झालेल्या नऊ महिन्यांच्या मुलाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:54 PM2020-05-21T17:54:06+5:302020-05-21T17:55:13+5:30

उंचावरून पडल्यानंतर फ्रॅक्चर झाल्याने मुलाच्या मेंदूचा काही भाग कवटीतून बाहेर आला होता...

Save Life of a nine-month-old boy who suffered a skull fracture after falling from the first floor | पहिल्या मजल्यावरून पडल्याने कवटी फॅक्चर झालेल्या नऊ महिन्यांच्या मुलाला जीवनदान

पहिल्या मजल्यावरून पडल्याने कवटी फॅक्चर झालेल्या नऊ महिन्यांच्या मुलाला जीवनदान

Next
ठळक मुद्दे5-6 तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान फ्रॅक्चर झालेल्या भागाची दुरुस्ती

पुणे: पहिल्या मजल्यावरून पडल्याने डोक्याच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर झालेल्या नऊ महिन्यांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी मुलाला जीवनदान दिले. उंचावरून पडल्यानंतर फ्रॅक्चर झाल्याने मुलाच्या मेंदूचा काही भाग कवटीतून बाहेर आला होता. कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये मुलावर यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पार पडली. आमच्याकडे हे लहान मूल सात वाजता आले आणि तो बेशुद्ध पडले. सीटी स्कॅननंतर उघड झाले की कवटीच्या तिजोरीत फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर साइटद्वारे मेंदू बाहेर आला आहे. मेंदूचे लक्षणीय नुकसान झाल्यामुळे आम्ही मुलावर ऑपरेशन करण्याचे ठरविले. आम्ही 5-6 तासांच्या लांब शस्त्रक्रियेदरम्यान कवटीची हाड काढली आणि मेंदूच्या खराब झालेल्या भागाची दुरुस्ती केली. पुढील तीन ते चार दिवस तो व्हेंटिलेटरवर होता आणि नंतर हळूहळू बरा झाला. तो आता पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि त्याने सर्व उपचार यशस्वीरित्या पूर्ण केल्याने त्याला घरी सोडण्यात आले असल्याची माहिती न्यूरो सर्जन डॉ. प्रवीण सुरवशे यांनी दिली. 
दरम्यान,लॉकडाऊनच्या कालावधीत पहिल्या आणि दुस-या मजल्याच्या उंचीवरून पडल्यामुळ? डोक्यात गंभीर दुखापत होणा-या लहान मुलांच्या वाढत्या संख्येबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.मागील काही महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सर्वांच्याच हालचालींवर निर्बंध आले आहेत. परिणामी मुलांची अवस्था घरात कोंडल्याप्रमाणेच आहे. अशावेळी पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी लहान मुलाच्या कार्यांविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे. लहान मुलांचे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांची आवश्यक काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 
......  
मुलांना अशा परिस्थितीत नैसर्गिकरित्या अस्वस्थता वाटेल. म्हणूनच पालकांनी काळजी घ्यावी व मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. बाल्कनी किंवा टेरेसचे दरवाजे पहारा नसल्यास बंद ठेवा. संरक्षित भागात देखील लहान मुलांवर लक्ष ठेवा. लहान मुलांना जड साहित्यापासून दूर ठेवा. आपण कामात व्यस्त असल्यास मुलांवर नियमित अंतराने लक्ष ठेवा. घरात आई-वडील किंवा सासू-ससुर असल्यास मुलांवर लक्ष ठेवण्यास त्यांची मदत घ्या- डॉ. प्रवीण सुरवशे, प्रसिद्ध न्यूरो सर्जन ......

Web Title: Save Life of a nine-month-old boy who suffered a skull fracture after falling from the first floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.