पुरात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस व तरूणांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 03:10 PM2020-10-12T15:10:37+5:302020-10-12T15:13:00+5:30

बारामतीतील घटना; सुमारे एक तास चालले थरारनाट्य..

The save lives of the brothers who stuck in the flood due to the youthfulness of the situation | पुरात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस व तरूणांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान

पुरात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस व तरूणांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान

Next
ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे तसेच नाझरे धारणातून सोडलेल्या पाण्यामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहतेय

बारामती : बारामती शहरात कऱ्हा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस, युवकांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले. सुमारे एक तास हे थरारनाट्य सुरू होते. सोमवारी (दि. १२) दुपारी एकच्या दरम्यान हा प्रकार घडला.बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्ग लागत असणाऱ्या लहान पुलाजवळ पाण्यात तोल जाऊन पडलेल्या दोन युवकांना पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. परिणामी बारामती तालुक्याच्या जिरायती भागात देखील मुसळधार पावसामुळे तसेच नाझरे धारणातून सोडलेल्या पाण्यामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कऱ्हा नदीच्या पाण्यामध्ये उतरण्याचे कोणी धाडस करत नाही. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १२) एकच्या सुमारास कपडे धुण्यासाठी आलेल्या ऋतू हिम्मत भोसले (वय १८) व बंटी भोसले  (वय १६) हे दोन भाऊ कपडे धुत असताना त्यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडले. मागील वर्षी पुरात वाहून गेलेल्या लहान पुलाला पकडले मात्र हा पूल वाहून गलेल्याने येथे असणाऱ्या सिमेंटच्या पाईप मध्ये अडकून पडले.  वरून पाण्याच्या प्रचंड दबावाने त्या दोघांना पाण्यातुन बाहेर येता येत नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस व स्थानिक तरुण मदतीला धावले व जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने बंटी भोसलेला बाहेर काढण्यात यश आले. तर ऋतू मात्र पाण्यातील झुडपात अडकवून बसला होता व मदतीची याचना करत होता.

पोलिसानी तेथे असणाऱ्या साडीच्या मदतीने किशोर लोखंडे याने सावधपणे ऋतूला बांधत विरुद्ध दिशेला ओढले. याचवेळी पोलिसानी या तरुणाला वरती ओढून त्याचे प्राण वाचवले घडलेला प्रकार लक्षात आल्यावर सहाय्यक पोलीस अधिकारी पद्मराज गंपले ,सहाय्यक पोलीस अधिकारी योगेश शेलार,पोपट नाळे ,राजभाऊ गायकवाड ,तुषार चव्हाण ,बापू इंगुले,होमगार्ड पी.खांमगळ,बारामती नगर परिषदेचे अधिकारी संजय प्रभुणे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जाधव,किशोर लोखंडे या तरुणांनी अथक प्रयत्नांनी दोघांचे प्राण वाचवले शहरात सर्वत्र कौतुक होते आहे.
———————————

Web Title: The save lives of the brothers who stuck in the flood due to the youthfulness of the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.