दुर्मिळ ह्रद्यरोगातून महिलेला वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:21+5:302021-03-13T04:21:21+5:30

पुणे : छातीत तीव्र वेदना होत असलेल्या एका ४१ वर्षीय महिलेला तिच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. या महिलेला ...

Saved woman from rare heart disease | दुर्मिळ ह्रद्यरोगातून महिलेला वाचवले

दुर्मिळ ह्रद्यरोगातून महिलेला वाचवले

Next

पुणे : छातीत तीव्र वेदना होत असलेल्या एका ४१ वर्षीय महिलेला तिच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. या महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी त्यांचा रक्तदाब ६० पर्यंत खाली आला होता. त्यामुळे हृदयाची आकुंचन क्षमता २० टक्क्यांवर आली. महिलेचे वजन खूप कमी झाले. डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी सुरु केली. मात्र, त्यांना हृदयाच्या डाव्या बाजूच्या मुख्य रक्तवाहिनीच्या मूळ स्थानाचा शोध लागत नव्हता. दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या कॅथेटर्सचा वापर करून मुख्य रक्तवाहिनीचा शोध उजवीकडून करण्यात आला. ही रक्तवाहिनी शंभर टक्के खंडित (ब्लॉकेज) असल्याचे आढळून आले. दहा हजारांपैकी अवघ्या पाच जणांना हा आजार होतो.

प्राथमिक अँजिओप्लास्टीच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे आले. कमी रक्तदाब, हृदयाची कमकुवत झालेली कार्यक्षमता, असामान्य हृदयाचे ठोके, डाव्या बाजूतील मुख्य रक्तवाहिनी न सापडणे आव्हानात्मक होते. अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यानंतर रुग्णाला सहा दिवसांनी घरी सोडण्यात आले, असे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगजीत देशमुख यांनी सांगितले.

चौकट

ईएफ आकडे महत्त्वाचे का?

एखाद्याला हृदयविकाराचा अर्थ हृदय क्षमतेनुसार काम करत नाही. एलव्हीईएफचे सामान्य प्रमाण ५५ ते ७० टक्के असणे अपेक्षित असते. एलईव्हीएफ ५५ टक्के असेल तर प्रत्येक हृदयाच्या ठोक्याबरोबर हदयाच्या डाव्या कक्षातून ५५ टक्के रक्तप्रवाह होत असतो. हृदयाच्या स्थितीवर आणि उपचारांच्या परिणामकारकतेवर इएफचे प्रमाण कमी-जास्त होते.

Web Title: Saved woman from rare heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.