पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:03 PM2022-02-09T17:03:01+5:302022-02-09T17:03:08+5:30

राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजर राहणार

Savitri bai fule statue at Pune University will be unveiled on 14 February | पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

Next

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उद्य सामंत पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाला भेट दिली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासंदर्भात पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. त्यावेळी त्यांनी १४ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. 

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

- येत्या 14 फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे 
-  राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजर राहणार 
 - जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल
- लतादीदींच्या नावाने संगीत महाविद्यालयाची स्थापना होणार
 - भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या परिसरात होणार असून देशातील सगळ्यात मोठे महाविद्यालय असणार

Web Title: Savitri bai fule statue at Pune University will be unveiled on 14 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.