वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीच्या लेकींची बाजी
By admin | Published: January 11, 2017 02:12 AM2017-01-11T02:12:47+5:302017-01-11T02:12:47+5:30
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामीण भागातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व
रांजणगाव गणपती : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामीण भागातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी जिल्ह्यातून १ हजार ३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली.
नुकत्याच या जिल्हास्तरीय स्पर्धांचा निकालाचे बक्षीस वितरण पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी माजी महापौर अंकुश काकडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकर ताकवले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, डॉ. शैलेश मोहिते, युवकचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, प्राचार्य भाऊसाहेब बेंद्रे तसेच स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. अपर्णा साबणे, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. सुनंदा मिसाळ, डॉ. विजय बालघरे, डॉ. नानासाहेव पवार यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
निकाल पुढीलप्रमाणे :
निंबध स्पर्धा- प्रथम क्रंमाक सई वळसे (विद्या विकास मंदिर, अवसरी बुद्रुक), द्वितीय क्रमांक निकिता वडे (पायरस मेमोरियल स्कूल, चाकण), तृतीय क्रंमाक अंगारकी मांडे (विघ्नहर विद्यालय, ओझर).
वक्तृत्व स्पर्धा- कनिष्ठ महाविद्यालयीन गट
प्रथम- गिरिजा पाटील (गोपीनाथ विद्यालय, वरवंड), द्वितीय- वैष्णवी सहस्रबुद्धे (राजा रघुनाथ विद्यालय, भोर), तृतीय- पार्थ भोर (चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, बारामती).
वरिष्ठ महाविद्यालयीन गट-
प्रथम- गोविंदा राठोड
(ए.सी.कॉलेज, चाकण), द्वितीय- प्रीतेश पठारे (चां.ता.बोरा महाविद्यालय, शिरूर), तृतीय- अक्षता शिंदे (अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर).