सावित्री उत्सव रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:46+5:302021-01-03T04:13:46+5:30
पुणे : कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत व एस एम जोशी सोशलीस्ट फाउंडेशन यांच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात ...
पुणे : कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत व एस एम जोशी सोशलीस्ट फाउंडेशन यांच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सावित्री उत्सव’ कार्यक्रम पार पडला. सुमारे दीडशे कचरा वेचक तरूणींनी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षण व स्त्रीमुक्तीच्या लढयातील योगदानाला उजाळा देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. यावेळी सावित्रीबाईंच्या लेखनाचे संकलन केलेले ‘सावित्री वदते’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. रेशमा खाडे, प्रणिता वारे व संजय रेंदळकर यांची ही संकल्पना होती. या कार्यक्रमासाठी शीला आढाव, सुभाष वारे व सुरेखा गाडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत च्या कार्यकर्ता गौरी वाघमारे म्हणाल्या की, सावित्रीबाईंच्या कायार्मुळेच आम्ही शिक्षण घेऊ शकलो. त्यांचा जन्मदिन आम्ही विसरू शकत नाही.