सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम गैरव्यवहार; कर्मचाऱ्यांकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:04 AM2018-12-18T02:04:31+5:302018-12-18T02:05:18+5:30

पुण्यासह ७ विद्यापीठांमधील प्रकार : सर्वांना मूळ पदावर केले पदावनत

Savitribai Phule Designation Mismanagement at University of Pune; Recovery from Employees | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम गैरव्यवहार; कर्मचाऱ्यांकडून वसुली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम गैरव्यवहार; कर्मचाऱ्यांकडून वसुली

Next

दीपक जाधव 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह ६ विद्यापीठांमध्ये शेकडो अधिकारी व कर्मचाºयांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. राज्य शासनाने बेकायदेशीरपणे बदललेली ही पदनामे रद्दबातल ठरवली असून अधिकारी व कर्मचाºयांना मूळ पदावर आणले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पदनाम बदलून गेले ८ ते १० वर्षे घेतलेली वाढीव पगाराच्या वसुलीची करण्याचे आदेश सोमवारी शासनाने दिले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या पदनाम गैरव्यवहार ‘लोकमत’ने उजेडात आणून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ (जळगाव), संत गाडगेबाबा विद्यापीठ (अमरावती), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आदी ६ विद्यापीठांमध्ये हे गैरप्रकार घडले आहेत. अखेर याप्रकरणी राज्य शासनाने बेकायदेशीरपणे बदलले पदनाम रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.
विद्यापीठातील विविध पदांच्या पदनामात बदल करताना ज्या पदांच्या वेतनश्रेण्यांमध्ये बदल झाला ते रदद् करण्यात आले आहेत. पदनाम बदलून उचलेल्या वाढीव पगाराची वसुली सातवा वेतन लागू केल्यानंतर कर्मचाºयांना द्यावयाच्या दयेय रकमेमधून वळती करून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांच्या पेन्शनमधून या रकमेची वसुली केली जाणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाºयांची सेवा पुस्तके विभागीय लेखाधिकाºयांकडून तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाच्या आकृतिबंधानुसार कोणत्याही विद्यापीठांत अ, ब, क, ड हे चार पदगट आहेत. त्यामध्ये पदनाम बदलून ड गटाच्या कर्मचाºयांनी क गटाचा, क गटाच्या कर्मचाºयांनी ब गटाचा, तर ब गटाच्या कर्मचाºयांनी अ वर्गातील अधिकाºयांची वेतनश्रेणी मिळवली आहे. यामध्ये वेतनश्रेणी बदललेल्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या वेतनामध्ये सरासरी ८ ते १० हजारांची वाढ झाली होती. विशेष म्हणजे हा निर्णय त्यांनी पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करून घेतला होता. यासाठी शासनाच्या वित्त विभागाची कोणतीही मान्यता घेण्यात आली नव्हती. राज्य शासनाकडून वेतनाची ही थकबाकी घेण्याऐवजी विद्यापीठ फंडातून ही रक्कम उचलण्यात आली होती. एकेका कर्मचाºयाला फराकापोटी काही लाखांच्या घरात फरकाची रक्कम मिळाली होती. हा वेतनाचा सर्व भार विद्यापीठ फंडावर पडला होता.

असा झाला होता पदनाम गैरव्यवहार...
४शासनाच्या आकृतिबंधानुसार कोणत्याही विद्यापीठांत अ, ब, क, ड हे चार पदगट आहेत. त्यामध्ये पदनाम बदलून ड गटाच्या कर्मचाºयांनी क गटाचा, क गटाच्या कर्मचाºयांनी ब गटाचा, तर ब गटाच्या कर्मचाºयांनी अ वर्गातील अधिकाºयांची वेतनश्रेणी मिळवली आहे. उदा. : विद्यापीठांमध्ये क श्रेणीमध्ये क्लार्कपदावर कर्मचाºयांनी कक्षाधिकारी हे नाव धारण करून ब गटाची वेतनश्रेणी मिळवली. अशाच प्रकारे इतर पदांचे केवळ नाव बदलून वेतनश्रेणी बदलली.

वेतनश्रेणीतील दुरुस्तीसाठी समिती स्थापन
राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह ६ विद्यापीठांमधील अधिकारी व कर्मचाºयांची बदललेली पदनामे पूर्ववत केल्यानंतर वेतनश्रेणीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. उपसंचालक (वित्त व लेखा सेवा), सहायक संचालक लेखा, - लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी या ४ जणांची समिती याबाबतचा अभ्यास करून वेतनश्रेणी पूर्ववत करणार आहे.
 

Web Title: Savitribai Phule Designation Mismanagement at University of Pune; Recovery from Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.