हायर एज्युकेशन क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पहिला नंबर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 01:58 AM2018-10-02T01:58:25+5:302018-10-02T02:00:26+5:30

द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारी : अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याची विद्यार्थ्यांची मागणी

Savitribai Phule is the first number of Pune University in higher education category, but ... | हायर एज्युकेशन क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पहिला नंबर, पण...

हायर एज्युकेशन क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पहिला नंबर, पण...

Next

पुणे : आॅक्सफर्ड आॅफ द ईस्ट अशी ख्याती असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. विद्यापीठामध्ये करण्यात येणारं संशोधन, अभ्यासक्रम, सोयी-सुविधा यांच्या आधारे हे मानांकन देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या यशाबद्दल विद्यापीठातील विद्यार्थ्यांना काय वाटते ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्रजीमध्ये एम. फिल करणारा अमोल सरवदे म्हणाला, की विद्यापीठाचा पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक आला असला तरी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतिगृहे विद्यापीठात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खासकरून विद्यार्थिनींना वसतिगृह न मिळाल्यास नातेवाईकांकडे किंवा बाहेर खोली घेऊन राहावे लागते. यात त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. संशोधनात मात्र विद्यापीठाने चांगली प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्यास विद्यापीठाच्या संयुक्त क्रमवारीत आणखी सुधारणा होऊ शकते.
पॉलिटिकल सायन्सच्या दुसºया वर्षाला असणारी रुक्साना शेख म्हणाली, की राज्यातील तसेच देशातील अन्य पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठाचा दर्जा खूप चांगला आहे. शिक्षणाच्याबाबतीत विद्यापीठ चांगली कामगिरी करत आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाने इतर गोष्टींवरसुद्धा लक्ष द्यायला हवे. विद्यापीठातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अनेक असुविधा आहेत.

याबाबत आम्ही अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु विद्यापीठाकडून फारसे लक्ष दिले नाही. त्याचबरोबर विद्यापीठातील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन टाकण्यासाठीची कुठलीही सोय केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवेशप्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक आहे. वसतिगृहांची संख्यासुद्धा वाढवायला हवी. दर महिन्याला विज्ञान फेस्टिवल भरविण्यात येते. त्याचबरोबर
विविध तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. विद्यापीठाचे शिक्षकही उत्तम शिकवतात. विद्यापीठात अनेक संशोधन केंद्रसुद्धा आहेत.


अनेक गोष्टींवर विद्यापीठाने भर देणे आवश्यक
पारंपारिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळवला, याचा आनंद आहे. परंतु अनेक गोष्टींवर विद्यापीठाने भर देणे आवश्यक आहे.
खेड्यातून येणाºया विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सोयी, वसतिगृह निर्माण करायला हवीत. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठीसुद्धा विविध सोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात, असे मत विद्यापीठातून डीटीडीमध्ये डिप्लोमा करणाºया सरस्वती वीरकर हिने व्यक्त केले.
बायोकेमिस्ट्रीमध्ये एम. फिल करणारा नितीन कदम म्हणतो, की इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठात चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळते.
संसोधनाला विद्यापीठाकडून जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जाते.

Web Title: Savitribai Phule is the first number of Pune University in higher education category, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.