सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: अधिकार, अभ्यास मंडळाची आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 03:25 AM2018-01-21T03:25:17+5:302018-01-21T03:25:30+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्हयातून एकूण १० हजार ५९४ मतदार हक्क बजावणार आहेत.

Savitribai Phule Pune University: Election of the Right to Education Board | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: अधिकार, अभ्यास मंडळाची आज निवडणूक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: अधिकार, अभ्यास मंडळाची आज निवडणूक

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्हयातून एकूण १० हजार ५९४ मतदार हक्क बजावणार आहेत.
अधिसभेवर प्राचार्य गटातून १० सदस्य, अध्यापक गटातून १० सदस्य, विद्यापीठ अध्यापकांतून ३ सदस्य व प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. प्राचार्य गटातून खुल्या गटातील ५ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर राखीव जागांपैकी अनुसूचित जाती या संवर्गातून दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. अन्य इतर मागास प्रवर्ग, महिला, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्राचार्य गटासाठी ३०३ मतदार आहेत.
अध्यापक शिक्षक संघातून १० जागांसाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी स्पुक्टो-पुटा पॅनल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ पॅनल यांनी उमेदवार उभे केले आहेत. खुल्या गटातील ५ जागांसाठी ११ उमेदवार आहेत. तर अनुसूचित जाती संवगार्तून एक जागेसाठी ६, अनुसूचित जमाती गटातून १ जागेसाठी २ उमेदवार, डीटीएनटी गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, इतर मागास प्रवगार्तून १ जागेसाठी २, तर महिला गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अध्यापक गटासाठी १० हजार २९१ मतदार आहेत.

मतदान केंद्रात मोबाइलला मनाई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्राच्या आत मोबाइल अथवा इतर विद्युत संचरण उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मोबाइलमधून मतपत्रिकेचा फोटो काढताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी स्पष्ट केले आहे

Web Title: Savitribai Phule Pune University: Election of the Right to Education Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.