SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:20 PM2021-11-22T12:20:38+5:302021-11-22T12:42:58+5:30

अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे.

Savitribai Phule Pune University employees strike today | SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन

SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन

Next

पुणे: मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे.

राज्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी अदा करावी, पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १०, २० आणि ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी.  अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीही आज काम बंद आंदोलन केले आहे. 

Web Title: Savitribai Phule Pune University employees strike today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.