सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:30 PM2021-04-19T22:30:58+5:302021-04-19T22:31:13+5:30

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे.

Savitribai Phule Pune University seized one and a half hundred copy student | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर

googlenewsNext

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्रची परीक्षा घेतली जात असून या परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याचे आढळून आले आहे. विद्यापीठातर्फे या कॉपीबहाद्दरांना विद्यापीठाच्या तक्रार समिती समोर उभे केले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात असल्या तरी गैरप्रकार करणार्‍यांकडे विद्यापीठाच्या यंत्रणेचे बारीक लक्ष असल्याचे समोर आले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असून त्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या यंत्रणेतून सुटत नाहीत.
विद्यापीठाच्या परीक्षा 10 एप्रिल पासून सुरू झाले असून आत्तापर्यंत परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पकडले आहे. एकाच दिवशी ७४ विद्यार्थी कॉपी करताना विद्यापीठाच्या प्राॅक्टर्ड यंत्रणेने शोधले आहे. त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी ग्रुप करून ऑनलाइन परीक्षा देत असल्याचे आढळून आले आहे. तसेच काही विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे पाठवत असल्याचे समोर आले आहे.
-----------
विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. विद्यापीठाच्या इमेज प्रॉक्टर्ड यंत्रणेतून या विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांना विद्यापीठाच्या तक्रार समिती समोर उभे केले जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू असल्या तरी गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाचे लक्ष आहे.
- महेश काकडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Savitribai Phule Pune University seized one and a half hundred copy student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.