सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय :जुलै -ऑगस्टमध्ये बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 03:56 PM2020-05-14T15:56:45+5:302020-05-14T16:01:08+5:30

नोकरी करत शिक्षणपूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणी आणि गृहिणींसाठी विद्यापीठाचा बहिस्थ: अभ्यासक्रम उपलब्ध

Savitribai Phule Pune University's decision : external Studtent School Examination in july- august | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय :जुलै -ऑगस्टमध्ये बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय :जुलै -ऑगस्टमध्ये बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा

Next
ठळक मुद्देसर्व तपशील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा जुलै -ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपाची असेल तसेच या  परीक्षेसंदर्भातील सर्व तपशील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील,असे  मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक व विद्यापीठाचे अधिष्ठाता संजीव सोनवणे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

नोकरी करत शिक्षणपूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आणि गृहिणींसाठी विद्यापीठाने बहिस्थ: अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला होता. परंतु, बहिस्थ: अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करून विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षात मुक्त अध्ययन प्रशाळा विभागातर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. पुणे , अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य ,व्यवस्थापनशास्त्र आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.

विद्यापीठातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या अभ्यासकेंद्रांवर या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून त्यांच्या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे निर्माण झालेल्या वातावरणात विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेणे शक्य झाले नाही. तसेच या विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्यही देता आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेतला आहे त्या अभ्यास केंद्रावर लॉकडाऊन उठल्यानंतर साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्ययन साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार या विद्यार्थ्यांच्या  २०१९-२० या शैक्षणिक वर्षवर्षाची गणना ऑगस्ट २०१९ ते सप्टेंबर २०२० अशी असणार आहे. तसेच द्वितीय वर्षाचे प्रवेश ऑगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दरम्यान सुरू करण्यात येणार असून त्याबाबतची सूचना विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल , असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Savitribai Phule Pune University's decision : external Studtent School Examination in july- august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.