सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू; येत्या ३१ जुलैपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 10:22 PM2021-07-10T22:22:49+5:302021-07-10T22:23:37+5:30

पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

Savitribai Phule Pune University's PhD admission process begins; Deadline till 31st July | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू; येत्या ३१ जुलैपर्यंत मुदत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू; येत्या ३१ जुलैपर्यंत मुदत

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न विविध संशोधन केंद्रातील पीएचडी प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येते. विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २२ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल २४ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १२ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करता येतील. पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी लॉग-इन केल्यानंतर विद्यार्थी २ तास परीक्षा देऊ शकतील.

नेट, सेट, गेट, सीएसआयआर, आयसीएआर, डीबीटी आणि परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी सवलत देण्यात आली आहे. परीक्षेत संशोधन पद्धती व विद्यार्थ्यांच्या विशेष विषयावरील प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातील. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर प्रवेश पूर्व परीक्षेतून सवलत मिळालेल्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ८०० रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सुमारे दोन वर्षांपासून अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. पीएचडी साठी मार्गदर्शक मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी साठी प्रवेश मिळू शकला नाही. मात्र विद्यापीठाने पीएचडी मार्गदर्शक आन साठी नवीन नियमावली प्रसिद्ध केले आहे. या नियमावलीमुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील अधिकाधिक प्राध्यापकांना पीएचडी गाईड म्हणून मान्यता मिळणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील संशोधन प्रक्रियेला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Savitribai Phule Pune University's PhD admission process begins; Deadline till 31st July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.