सव्वादोन लाखांच्या पाण्याच्या मोटारी चोरल्या
By admin | Published: April 27, 2017 04:47 AM2017-04-27T04:47:53+5:302017-04-27T04:47:53+5:30
उरुळी देवाची येथील एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी २ लाख २५ हजार ३५० रुपये किमतीच्या १४३ नवीन पाण्याच्या मोटारी चोरून नेल्या आहेत.
लोणी काळभोर : उरुळी देवाची येथील एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी २ लाख २५ हजार ३५० रुपये किमतीच्या १४३ नवीन पाण्याच्या मोटारी चोरून नेल्या आहेत.
राजा अरुणकुमार मरीआप्पन हे नदी एन्टरप्रायजेस नावाने पाण्याच्या मोटार विक्रीचा व्यवसाय गेली एक वर्षांपासून उरुळी देवाची गावचे हद्दीत सह्याद्री हॉटेलजवळ सर्व्हे क्रमांक १३३/१५ मधील जयेश ठक्कर यांच्या मालकीचे असलेल्या गोडावूनमध्ये करतात. ते कोईम्बतूर, तमिळनाडू येथून पाण्याच्या मोटार आणून पूर्ण महाराष्ट्रातील दुकानात मागणीप्रमाणे होलसेल दरात पुरवठा करतात. त्यांचे मदतीला गोडावूनमध्ये जितेंद्रसिंग नरेंद्रसिंग राठोड (मूळ रा. राजस्थान, सध्या उरुळी देवाची) गेली ८ महिन्यांपासून कामास आहेत. मरीआप्पन यांनी २२ एप्रिल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गोडावून बंद केले.
ते २४ एप्रिल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरी असताना त्याच्याशी राठोड याने संपर्क साधला व आपल्या गोडावूनचे शटर कोणीतरी मध्यभागापासून बाहेर ओढून वाकवून त्यावाटे आत प्रवेश करून आतील पाण्याच्या मोटारी चोरून नेल्याचे कळवले.
मरीआप्पन तेथे पोहोचले व पाहणी केली असता गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या मोटारी अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या.
बऱ्याच मोटारी कमी झाल्याचे दिसल्याने सर्व मालाचे रेकॉर्डप्रमाणे मोजमाप केले असता ८१ हजार ५३८ रुपये किमतीच्या पाण्याच्या मोटारी अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. बऱ्याच मोटारी कमी झाल्याचे दिसल्याने सर्व मालाचे रेकॉर्डप्रमाणे मोजमाप केले असता ८१ हजार ५३८ रुपये किमतीच्या प्रत्येकी १३८२ रुपये किंमत असलेल्या वाहिनी इंजिनियरिंग कंपनीच्या १/५ एस मॉडेलच्या ५९ मोटारी, १२ हजार ८८८ रुपये किमतीच्या प्रत्येकी २१४८ रुपये किमत असलेल्या वाहिनी इंजिनिअरिंग कंपनीच्या एएसएसपी १-०५ मॉडेलच्या ६ मोटारी, २४ हजार ५१६ रुपये किमतीच्या प्रत्येकी २०४३ रुपये किमत असलेल्या वाहिनी इंजिनियरिंग कंपनीच्या एएसपी ०६-१० सीआय-१ मॉडेलच्या १२ मोटारी, ३१ हजार ०८ रुपये किमतीच्या प्रत्येकी ३८७६ रुपये किंमत असलेल्या वाहिनी इंजिनिअरिंग कंपनीच्या एएच ०३ -१, ० मॉडेलच्या ८ मोटारी, ७५ हजार ४०९ रुपये किमतीच्या प्रत्येकी १३०० रुपये किंमत असलेल्या बिंदू इंजिनिअरिंग कंपनीच्या ०.५ एचपीसीआरटी मॉडेलच्या ५८ मोटारी अशा एकून २ लाख २५ हजार ३५० रुपये किमतीच्या १४३ नवीन पाण्याच्या मोटारी कमी आढळून आल्याने त्यानी अज्ञात चोरट्यांविरोधांत तक्रार दिली आहे. (वार्ताहर)