सव्वादोन लाखांचा गंडा

By Admin | Published: January 11, 2017 03:39 AM2017-01-11T03:39:05+5:302017-01-11T03:39:05+5:30

कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून गृहकर्ज देण्याच्या बहाण्याने २ लाख २२ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Savvadon loses money | सव्वादोन लाखांचा गंडा

सव्वादोन लाखांचा गंडा

googlenewsNext

 पुणे : कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून गृहकर्ज देण्याच्या बहाण्याने २ लाख २२ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी महादेव श्रीमंत ठोंबरे (वय ३१, रा़ बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़ बिबवेवाडी पोलिसांनी उदय प्रतापसिंह, विजय मल्होत्रा व अमित सक्सेना या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोंबरे यांना आपण कोटक महिंंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांना गृहकर्ज मिळवून देतो, असे सांगितले. तसेच, वेळोवेळी त्यांना त्यासाठी बँक खात्यावर पैसे भरायला लावले. ठोंबरे यांनी त्याच्या खात्यावर २ लाख २२ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करण्यात आले नाही. तसेच त्यांच्या फोनला त्यांनी उत्तर दिले नाही.

Web Title: Savvadon loses money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.