सवाई महोत्सव एक जानेवारीला
By admin | Published: December 21, 2014 12:03 AM2014-12-21T00:03:47+5:302014-12-21T00:03:47+5:30
देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आता पुन्हा १ ते ४ जानेवारी २०१५ दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे रंगणार आहे.
पुणे : देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आता पुन्हा १ ते ४ जानेवारी २०१५ दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे रंगणार आहे. अवकाळी पावसाने रसिकांच्या आनंदावर विरजण पाडल्यामुळे महोत्सव स्थगित करण्याची वेळ आर्य संगीत प्रसारक मंडळावर आली होती. त्यामुळे लवकरच हा महोत्सव पुन्हा आयोजित करण्याचे मंडळाने जाहीर केले होते़
त्यानुसार हा महोत्सव घेण्यात येत असून, लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटासाठी पुणेकरांना रांगा लावण्याची वेळ येते, मात्र रसिकांना पुन्हा या दिव्यातून जावे लागू नये, यासाठी महोत्सवाची तिकिटे ज्या रसिकांनी घेतली होती, तीच तिकिटे आता नव्याने आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवासाठी ग्राह्य धरली जातील, त्यामुळे ही तिकिटे जपून ठेवण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
आधीची तिकिटे ग्राह्य
च्सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटासाठी रसिकांना रांग लावावी लागते. रसिकांना पुन्हा ही प्रक्रिया करावी लागू नये, यासाठी ज्या रसिकांनी महोत्सवाची तिकिटे घेतली होती. तीच तिकिटे या महोत्सवासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे एक जानेवारीपासून होणाऱ्या महोत्सवासाठी वेगळी तिकिटे काढण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.