सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर, वाचा कधी रंगणार सुरांचा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:42 PM2019-10-02T16:42:10+5:302019-10-02T16:44:54+5:30
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यंदाही मागीलवर्षीप्रमाणे मुकुंदनगर भागात पाच दिवस रसिकांना मेजवानी मिळणार आहे. यंदाचे महोत्सवाचे ६७वे वर्ष आहे.
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यंदाही मागीलवर्षीप्रमाणे मुकुंदनगर भागात पाच दिवस रसिकांना मेजवानी मिळणार आहे. यंदाचे महोत्सवाचे ६७वे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सव डिसेंबर महिन्याच्या मध्यात अर्थात बुधवार दि. ११ डिसेंबर ते रविवार दि. १५ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.
सवाई महोत्सवाचे संगीत रसिकांच्या मनात अढळ स्थान आहे. अगदी देश विदेशातूनही अनेकजण महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे तारखांची दरवर्षी प्रतीक्षा असते.