पुणेकरांची प्रतीक्षा संपली..! सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १८ डिसेंबरपासून रंगणार

By श्रीकिशन काळे | Published: November 29, 2024 05:12 PM2024-11-29T17:12:58+5:302024-11-29T17:13:29+5:30

वोदित तरीही आश्वासक व दमदार कलाकारांची सादरीकरण ठरणार याही वर्षीच्या ‘सवाई’चे वैशिष्ट्य

Sawai Gandharva Bhimsen Festival will be held from December 18 | पुणेकरांची प्रतीक्षा संपली..! सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १८ डिसेंबरपासून रंगणार

पुणेकरांची प्रतीक्षा संपली..! सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १८ डिसेंबरपासून रंगणार

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदाच्या वर्षी आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी (दि.२९) पुण्यात पत्रकार परिषदेत केली. यंदा महोत्सवाचे ७० वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे बुधवार दि. १८ डिसेंबर ते रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ दरम्यान महोत्सव होणार आहे.

यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे उपस्थित होते. श्रीनिवास जोशी म्हणाले, “माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरु केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. रसिक, जाणकार श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केले. यंदा ७० व्या वर्षात महोत्सव पदार्पण करीत असताना नवोदित तरीही आश्वासक, दमदार कलाकारांना ‘सवाई’ सारखे व्यासपीठ मिळावे, या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे.”

पहिल्या दिवशी १८ डिसेंबर रोजी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ कृष्णा बल्लेश यांच्या सुमधुर सनईवादनाने महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर किराणा घराण्याचे गायक उस्ताद मुबारक अली खान आणि गायक सुधाकर चव्हाण यांच्या शिष्या व सुपुत्री शाश्वती चव्हाण- झुरंगे आपली गायनसेवा प्रस्तुत करतील. यांनतर आग्रा व जयपूर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक राम देशपांडे यांचे गायन होईल. व्हायोलिन वादक डॉ. एल सुब्रमण्यम यांचे कर्नाटक शैलीतील वादन ऐकण्याची संधी यानंतर रसिकांना मिळेल. पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रबर्ती यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

दुसऱ्या दिवशीपासून सवाईमध्ये संगीता कट्टी-कुलकर्णी यांचे गायन, तिसऱ्या दिवशी सुप्रसिध्द गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होईल. पं. आनंद भाटे यांचे गायन, राकेश चौरसिया यांचे बासरीवादन, तर आरती अंकलीकर-टिकेकर या गायन करतील. इतरही अनेक मान्यवर कलावंत आपली कला सादर करतील.

महोत्सवात यांची पहिल्यांदाच सेवा !
शाश्वती चव्हाण- झुरंगे, कृष्णा बोंगाणे, नागेश आडगांवकर, अनुपमा भागवत, सहाना बॅनर्जी, रुचिरा केदार, सावनी तळवलकर, अनुजा बोरुडे- शिंदे, अदिती गराडे, रिषित देसिकन, सौरभ काडगांवकर, अदनान सामी, आरती ठाकूर कुंडलकर, अतिंद्र सरवडीकर, चेतना पाठक, अश्विनी मोडक

Web Title: Sawai Gandharva Bhimsen Festival will be held from December 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.