सवाई गंधर्व मुंबईत नव्हे पुण्यातच!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:14 PM2019-08-29T20:14:53+5:302019-08-29T20:19:47+5:30
त्यामुळे पुण्याचा सांस्कृतिक वारसा ठरलेला '' सवाई गंधर्व महोत्सव '' मुंबईत हलवल्याची चर्चा पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात सुरु झाली...
पुणे : दिग्गजांप्रमाणेच नवोदित कलाकारांना स्वरमंचावर सादरीकरणाची संधी मिळावी, यादृष्टीने आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यावर्षी मुंबईमध्ये सवाई संगीत संमेलन आयोजिले आहे. त्यामुळे पुण्याचा सांस्कृतिक वारसा ठरलेला '' सवाई गंधर्व महोत्सव '' मुंबईत हलवल्याची चर्चा पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात सुरु झाली. मात्र ती निराधार असल्याचा दावा आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे करण्यात येत आहे.
मुंबईत होणारा कार्यक्रम म्हणजे संगीत संमेलन आहे. एखाद्या शहरातील स्थानिक संस्थेच्या सहकार्याने संगीत संमेलन घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी बेळगाव, बडोदा, ठाणे, चंद्रपूर अशा विविध ठिकाणी संगीत संमेलन पार पडले आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मात्र पुण्यापुरताच मर्यादित राहील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने सांस्कृतिक विश्वात वेगळा मानदंड निर्माण केला आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचा मेरुमणी असलेला सवाई महोत्सव आणि पुण्याचे अनेक वर्षांपासूनचे अतूट नाते निर्माण झाले आहे. परदेशातूनही कानसेन सवाईचा श्रवणानंद घेण्यासाठी पुण्यामध्ये येतात. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी म्हणाले, की सांगितिक चळवळीच्या प्रसारासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून विविध ठिकाणी संस्थेतर्फे सांगितिक कार्यक्रमांचे केले आहे. यापूर्वी बेळगाव, बडोदा, ठाणे, चंद्रपूर अशा विविध ठिकाणी संगीत संमेलन पार पडले आहे. त्यामुळे यंदा मुंबईत होणा-या संमेलनाची ही पहिली वेळ नाही. संमेलनातील कलाकार आणि कार्यक्रमांचे स्वरुप लवकरच जाहीर केले जाईल.
गेल्या वर्षी पुण्यातील सवाई महोत्सवाचे स्थळ बदलले. सुमारे तीन दशकांपासून न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागेच्या मैैदानावर सवाईचे सूर घुमत होते. सवाई, रसिक आणि रमणबागेचे मैदान असे समीकरण तयार झाले होते. गेल्या वर्षी महोत्सव मुकूंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैैदानावर रंगला. त्या पाठोपाठ मुंबईतल्या संगीत संमेलनाच्या नावातही सवाई असल्याची बातमी आल्याने रसिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.
दरम्यान, मुंबईतल्या सवाई भीमसेन संगीत संमेलनात चार सत्रांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. सकाळी संगीत मार्गदर्शन आणि दुपारी शास्त्रीय संगीत विषयक ध्वनिचित्रफीत दाखवण्यात येणार आहेत. या संमेलनात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
ह्यह्यआर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यावर्षी २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये गोरेगावमधील प्रबोधन क्रीडा भवन येथे सवाई भीमसेन संगीत संमेलन पार पडणार आहे. गेल्या वषीर्ही षण्मुखानंद सभागृहात संगीत संमेलन पार पडले होते. त्यामुळे संमेलनाचे हे पहिले वर्ष नाही.ह्णह्ण -श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ.