ससूनच्या दुरुस्तीसाठी निधी
By admin | Published: June 25, 2017 05:02 AM2017-06-25T05:02:51+5:302017-06-25T05:02:51+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने ससून रुग्णालयाच्या इमारत देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी ३० लाख रुपयांची मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाने ससून रुग्णालयाच्या इमारत देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी ३० लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. अत्यावश्यक सेवेमुळे हा निधी मंजूर करण्यात आला असला तरी या कामाची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात कामांना सुरुवात केली जाणार आहे.
ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी पाणी टिपकत आहे. त्यामुळे प्रथमत: गळतीची कामे पूर्ण केली जातील. त्याचप्रमाणे ड्रेनेजलाईन चोकअप होत आहे. तसेच जळीत रुग्ण कक्ष यांची दुरुस्ती, वॉटरप्रुफिंग, तुटलेल्या फरशा बदलणे, भिंतींचे तुटलेलले प्लॅस्टर, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निविदा आठवड्याभरात काढल्या जातील. त्यानंतर संबंधित कंत्राटदारांना कामाचे आदेश दिले जातील. येत्या एप्रिल २०१८ पर्यंत दुरुस्तीची काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.