दौंड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सयाजी ताकवणे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:22+5:302021-02-10T04:10:22+5:30

दौंड पंचायत समितीत राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता आहे. दरम्यान माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या एकूण १२ ...

Sayaji Takwane as Deputy Chairman of Daund Panchayat Samiti without any objection | दौंड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सयाजी ताकवणे बिनविरोध

दौंड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सयाजी ताकवणे बिनविरोध

Next

दौंड पंचायत समितीत राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता आहे. दरम्यान माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या एकूण १२ जागांपैकी ११ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. तर विरोधकांना एक जागा मिळाली होती.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती आशा शितोळे, मावळते उपसभापती नितीन दोरगे, अप्पासाहेब पवार, वैशाली धगाटे, लक्ष्मण दिवेकर, रामभाऊ टुले आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसभापती सयाजी ताकवणे हे पारगाव (ता. दौंड) येथील रहिवाशी असून पंचायत समितीत ते ज्येष्ठ सदस्य आहेत. तालुक्याच्या विकासासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून नियोजन केले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी सयाजी ताकवणे यांनी सांगितले.

--

फोटो ओळी : ०९ दौंड पंचायत समिती उपसभापती निवड

फोटो क्रमांक : दौंड पंचायत समितीच्या उपसभापतिपदी सयाजी ताकवणे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करतांना माजी आमदार रमेश थोरात.

Web Title: Sayaji Takwane as Deputy Chairman of Daund Panchayat Samiti without any objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.