एस.बी. पाटील विद्यालयात ई-पीक पाहणी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:26+5:302021-09-27T04:11:26+5:30

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तलाठी सचिन करगळ व अकोला (भिगवण) येथील तलाठी महादेव भारती हे उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी ...

S.B. E-crop inspection workshop at Patil Vidyalaya | एस.बी. पाटील विद्यालयात ई-पीक पाहणी कार्यशाळा

एस.बी. पाटील विद्यालयात ई-पीक पाहणी कार्यशाळा

Next

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तलाठी सचिन करगळ व अकोला (भिगवण) येथील तलाठी महादेव भारती हे उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी मुलांना हे ॲप मोबाइलवर कसे घ्यावे. तसेच या ॲपचा वापर करून अगदी शेतामध्ये बसूनदेखील प्रत्येक शेतकरी पीक नोंदणी तसेच इतर संबंधित कामे जे की एक तलाठी करू शकतात, ते सगळे करू शकतात. भविष्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकरी याचा उपयोग करू शकतो, अशाप्रकारे खूप उपयुक्त महिती देऊन व ॲपमध्ये प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये ४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर ऑनलाइन १०४ असे एकूण १४९ विद्यार्थी व एकूण २४ शिक्षक सहभागी झाले होते. उपस्थित अधिकाऱ्यांचे शाळेचे प्राचार्य शैलेश दरेकर यांनी स्वागत केले. तसेच विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी कुमारी सुहानी शिंदे व सूरज माने यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यशाळा उत्साही वातावरणात पार पडली.

२६ इंदापूर पीक पाहणी

विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी ॲपचे मार्गदर्शन करताना तलाठी सचिन करगळ व इतर

Web Title: S.B. E-crop inspection workshop at Patil Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.