Scadoxus multiflorus :अरबी द्वीपकल्पात आढळणारे फुल आढळले आंबेगावच्या उगलेवाडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 06:53 PM2023-05-20T18:53:03+5:302023-05-20T18:56:49+5:30
या भागात कधीही न आढळणारे हे फुल अचानक जमिनीतून उगवून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय...
- कांताराम भवारी
डिंभे (पुणे) : अरबी द्वीपकल्प आणि प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका देशात आढळणारे स्कॅडॉक्सस मल्टीफ्लोरस सदृश्य फुल आंबेगाव तालुक्याच्या उगलेवाडी जवळील कलमजाई मंदिर येथे आढळून आले आहे. या भागात कधीही न आढळणारे हे फुल अचानक जमिनीतून उगवून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरला आहे. अनेक नागरिकांनी हे फूल पाहण्यासाठी येथे भेटी दिल्या.
उगलेवडी(ता. आंबेगाव) येथील कलमजाई मंदिर हे जुने प्राचीन कालीन जागृत देवस्थान आहे. पूर्वी याठिकाणी पाण्याचे तळे होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच जागे मध्ये दक्षिण आफ्रिका देशात आढळणारे हे स्कॅडॉक्सस मल्टीफ्लोरस फुलासारखे फुल येथील ग्रामस्थांना आढळून आले . ग्रामपंचायत फदालेवाडी-उगलेवाडी चे सरपंच विनोद उगले, उपसरपंच विलास उगले, महाराष्ट्र आरोग्य मंडळचे भोर ,किसन भोजने,विठ्ठल बोऱ्हाडे प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी केली असता त्यांना हे स्कॅडॉक्सस मल्टीफ्लोरस फुलासारखे दिसले असे त्यांचे म्हणणे आहे.
स्कॅडॉक्सस मल्टिप्लोरस ही एक बल्बस वनस्पती आहे. जी बहुतेक उपसार आफ्रिकेतील सेनेगल ते सोमालिया ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत आहे. हे मूळ अरबी द्वीपकल्प आणि सेशल्सचे मध्ये देखील आहे. हे मेक्सिको आणि चागोस द्वीपसमूहात नैसर्गिक कृत आहे हे भारतीय द्वीपकल्पात देखील आढळते.
प्रत्येक ऋतूंची काही वेगळी वैशिष्ट्ये असतात उन्हाळा म्हटले की अंगाची लाहीलाही करणारा काळ असतो. निसर्गही ओसाड वाटत असतो परंतु याच काळात काही झाडांना पालवी फुटते आणि फुले ही दिसू लागतात .
मे महिन्यात ही फुले येतात म्हणून त्यांना मे फ्लावर्स असं म्हटलं जातं. या फुलांना आकाराप्रमाणे फुटबॉल लिली पावडर पफ लीली, पिन कुशन लीली आणि रंगाप्रमाणे ब्लड लिली असेही म्हटलं जातं. ही फुलं साधारणता सहा ते सात दिवस राहू शकतात. त्यानंतर हलका जांभळा रंग घेऊन सुकून जातात. कंदापासून हे फुल उगवतं त्याचं वैज्ञानिक नाव स्केडॉक्सस मल्टिप्लोरस आहे तर पूर्वी या फुलांचं नाव हेमंन्थस मल्टीप्लोरस होतं ग्रीक मध्ये हेम म्हणजे रक्त आणि अँथस म्हणजे फुल यावरून हे नाव पडलं आहे.