बारामतीचा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:36+5:302021-03-04T04:16:36+5:30

जलसंधारणाच्या कामामुळे यंदा दुष्काळाची झळ नाही लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि त्याला वरूणराजाची ...

Scarcity of Baramati | बारामतीचा टंचाई

बारामतीचा टंचाई

Next

जलसंधारणाच्या

कामामुळे यंदा दुष्काळाची झळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि त्याला वरूणराजाची मिळाली साथ यामुळे यंदाच्या वर्षी बारामती तालुक्याचा टंचाई आराखडा तब्बल ५० टक्क्यांनी घटला आहे. तालुक्याच्या १ कोटी ५८ लाखांच्या टंचाई आराखड्याला जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे यंदा तालुक्याला दुष्काळाची झळ जाणवणार नाही.

उन्हाळा म्हटलं की बारामती तालुक्याच्या जिरायती भागाची तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत असे. अगदी जानेवारी महिन्यापसून जिरायती भागातील दुष्काळी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. परंतु मागील काही वर्षांमध्ये जिरायती भागात प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातून जलसंधारणाची प्रचंड कामे झाली आहेत. ओढा खोलीकरण, पाझर तलाव, वळण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव यामाध्यमातून तालुक्यात जलसाक्षरता मोठ्या प्रमाणात झाली. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलिमीटर एवढे आहे. मागील वर्षी पावसाने ही सरासरी ओलांडत विक्रमी आकडा गाठला. मागील वर्षी तालुक्यात तब्बल ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील सर्वच जलस्राेतांमध्ये ९१३.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला. पाऊस आणि झालेल्या पाणीसाठ्यामुळे प्रथमच टंचाई आराखड्यात ५० टक्क्यांनी घट झाली. जानेवारी-मार्चच्या दरम्यान तालुक्यातील २१ कामांना १ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तर गरज भासल्यास एप्रिल-जून दरम्यान टँकर सुरू करण्यात येतील असे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टंचाई आराखड्यात मंजूर कामे व निधी

काम संख्या निधी

पाणीपुरवठा योजना १३ ८२ लाख

विशेष दुरूस्ती

तात्पुरती नळ ४ २१ लाख

योजना

विहिरी खोलीकरण ४ ८ लाख

गाळ काढणे

तालुक्यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था व शासकीय विभागांच्या माध्यामातून जलसंधारणाची मोठी कामे झाली. तसेच आॅक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अजूनपर्यंत तालुक्यातील ओढ्यांना पाणी आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात टंचाई जास्त प्रमाणात जाणवणार नाही.

- राहुल काळभोर गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती

--------------------------------

Web Title: Scarcity of Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.