रानमळावस्ती येथील पुलाचे काम रखडल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:28 AM2018-11-13T01:28:33+5:302018-11-13T01:28:49+5:30
इंदापूरकडे जाणारे आवर्तन रोखणार : शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर काढण्यात होतेय अडचण
रावणगाव : खडकवासला कालव्यावरील रावणगाव रानमळावस्ती (ता. दौंड) येथील पूल कोसळून वर्ष उलटले तरी त्या पुलाचे काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थ होणाºया त्रासाला कंटाळून इंदापूर तालुक्याकडे जाणारे पुढील आवर्तन रोखण्याच्या तयारीत आहेत. येथील शिर्सुफळ तलावालगतच्या नवीन मुठा कालव्या वरील किलोमीटर १३७ / ४०५ हा सिमेंटी पुल ४आॅक्टोबर २०१७ रोजी अचानक कोसळल्याने परिसरातील शेतकºयांना ऊसा सह मोठ्या प्रमाणावर शेतमाल बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
हा पूल कोसळल्यामुळे साधारण दहा ते पंधरा हजार टन ऊसाचे क्षेत्र गाळपाअभावी रखडले आहे. या परिसरातील ऊस बाहेर काढण्यासाठी सहा ते सात किलो मीटर अंतर पार करावे लागत आहे. आजी - माजी आमदारांनी भूमिपूजन करून देखील या पुलाचे काम अजून झालेले नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन व पाटबंधारे विभागाला निवेदने देऊन ही प्रत्यक्ष कामास सुरवात होत नाही. पाटबंधारे विभागा तर्फे काम मंजूर असून के. पी. शिंगाडे या ठेकेदारास काम दिले आहे.शिंगाडे पाण्याचे आवर्तन चालू असल्याचे सांगून पुलाचे काम करण्यास टाळाटाळ करीत आहे.
या परिसरातील शेतकºयांना दैनंदिन प्रवास करण्यासाठी आपला जीव मुठीत धरून कठडे नसलेल्या अतिशय अरुंद पुलावरून प्रवास करावा लागत आहे. या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे यासाठी या परिसरातील शेतकºयांनी अनेक वेळा खडकवासला पाटबंधारे विभाग सिंचन भवन पुणे, खडकवासला पाटबंधारे उपविभाग दौंड, पाटबंधारे शाखा रावणगाव यांना वारंवार निवेदने देऊन देखील सदर पुलाचे बांधकाम होत नसल्यामुळे या परिसरातील शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर पुलाचे बांधकाम चालू न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे शेतकºयांनी म्हटले आहे.
खडकवासला कालव्याद्वारे सध्या दौंड , बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी आवर्तन चालू असून, हे आवर्तन बंद होताच सदर ठेकेदारास पुलाचे बांधकाम त्वरित चालू करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात येणार आहेत.
- सुभाष शिंदे, सहायक अभियंता श्रेणी २,
खडकवासला पाटबंधारे शाखा रावणगाव.