जिल्ह्यात देखाव्यांची रेलचेल

By admin | Published: September 23, 2015 03:29 AM2015-09-23T03:29:08+5:302015-09-23T03:29:08+5:30

जिल्ह्यात विविध गणेश मंडळांनी या वर्षी पारंपरिक, तसेच धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. अनेक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे

Scenes of the scenes in the district | जिल्ह्यात देखाव्यांची रेलचेल

जिल्ह्यात देखाव्यांची रेलचेल

Next

जिल्ह्यात विविध गणेश मंडळांनी या वर्षी पारंपरिक, तसेच धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. अनेक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे. पावसामुळे देखावे पाहण्यासाठी फारसे कुणी बाहेर पडले नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडल्याने सर्व रस्ते फुलले होते.
ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) शहरात एकूण १२ मंडळे आहेत. सर्व मंडळांनी संगीतावर चालणारी विद्युतरोषणाई सजावट म्हणून केली आहे.
जय बजरंग सेवा गणेश मंडळ ओतूर या मंडळाचे हे ५५ वे वर्ष आहे. या मंडळाचे अध्यक्ष जयसिंग डुंबरे, उपाध्यक्ष बापूसाहेब डुंबरे व सचिव धोंडीभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली ओतूर येथील पांढरी मारुती मंदिराच्या खुल्या व्यासपीठावर गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. समाजप्रबोधनासाठी दररोज सायंकाळी कीर्तने-भजने ठेवून कीर्तन महोत्सव साजरा करीत आहे.
अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर : हलता देखावा. या मंडळाचे हे १३ वे वर्ष आहे. या मंडळाने या वर्षी प्रथमच बैलगाडा शर्यत हा हलता देखावा सादर करून अश्वारूढ मार्तंड भैरवनाथ आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. रात्री हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

Web Title: Scenes of the scenes in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.