बारामती बसस्थानकातील वेळापत्रक कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 11:04 PM2019-04-01T23:04:54+5:302019-04-01T23:05:22+5:30
गैरसोयीचा प्रवाशांना फटका : सोयी-सुविधांचाही अभाव
सांगवी : बारामती बसस्थानकातून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, कोणत्याच बस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची पुरती तारांबळ उडाली आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या तिजोरीत जास्तीत जास्त वाढ कशी होईल, यासाठी मोठ्या जोमाने प्रयत्नशील राहून काम करत आहे, तर दुसरीकडे बारामती आगाराच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बारामती आगारात खासगी वाहतूक घुसखोरी करत प्रवाशांना बाहेर घेऊन जात आपल्या खासगी वाहनांतून प्रवाशांना पाहिजे तिथे सोडत आहेत. यामुळे परिवहन महामंडळाच्या खिशाला एकप्रकारे कात्रीच लावण्याचा प्रकार समोर येत आहे.
बारामती बस स्थानकात दररोज हजारो प्रवाशी ये-जा करत असतात. त्यातही अनेक मार्गांवरील एसटी बस वेळेवर येत नसल्याने प्रवासी ताटकळत बसत असल्यामुळे नाईलाजास्तव खासगी वाहनांचा पर्याय अवलंबत आहेत. तसेच एसटीत बसलेल्या प्रवाशांना त्रास होऊ नये,
यासाठी फेरीवाल्यांना एसटीमध्येच जाऊन खाद्यपदार्थ व पेय विक्रीस मनाई करण्यात आली आहे.
असे असतानादेखील यावर बंदी घालण्यास अधिकारीवर्ग अपयशी ठरत आहेत. यामुळे बारामती आगाराचे अधिकारी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास
येऊ लागले आहे. प्रवाशांची हेळसांड व गैरसोय रोखण्यासाठी आगारप्रमुख काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
प्रसाधनगृहात महिलांकडूनही आकारले जातात पैसे...
४शासनाने प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी प्रसाधनगृहात मोफत सुविधा दिली जाते. मात्र, बारामतीच्या आगारातील प्रसाधनगृहात लांब पल्ल्याच्या प्रवाशी महिलांकडून पैसे आकारले जात आहेत, पैसे घेण्यासाठी बसलेला कामगार महिलांकडे पैशाची मागणी करत असल्याने महिला नाईलाजाने पैसे काढून त्यांच्याकडे सोपवतात, तर याठिकाणी महिलांना मोफत सुविधा असल्याचा बोर्ड अद्यापही लावण्यात आला नाही, तर नवीन येणाºया पुरुषांकडूनदेखील ठरविल्याप्रमाणे जास्तीचे पैसे आकारले जात आहेत, याच ठिकाणी फेरीवाले व स्थानिक लोकांना त्याठिकाणी बसविण्यात येते, यामुळे काही महिलांना नाहक त्रासही जाणवत असतो, याबाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या गोष्टी आणूनदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
बारामती आगारात येणाºया खासगी वाहतूक करणाºयांना वारंवार हाकलून देत आहोत. प्रसाधनगृहात महिलांना मोफत सुविधा असून, या अगोदर पैसे घेत असल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. या पुढे सूचना देऊन संबंधित पैसे घेताना निदर्शनास आल्यास कारवाई करू.
- अमोल गोंजारी, आगार प्रमुख बारामती