शिष्यवृत्ती अर्जास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:15+5:302021-04-30T04:14:15+5:30

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारले जातात. त्यात उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. ...

Scholarship application extended till 31st May | शिष्यवृत्ती अर्जास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्जास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

Next

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारले जातात. त्यात उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता पात्र असूनही अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही अद्याप लाखो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता अर्ज केलेले नाहीत. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ‘कॉप्स’ विद्यार्थी संघटनेने उच्च शिक्षण विभागाकडे केली होती. त्यापार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच संबंधित अर्जाची महाविद्यालय आणि विभागस्तरावर अनुक्रमे येत्या १० जून आणि‌ येत्या १७ जून रोजी अर्जांची पडताळणी केली जाणार आहे, असे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Web Title: Scholarship application extended till 31st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.