Maha DBT| शिष्यवृत्त्यांचे अर्ज ३१ जानेवारीपर्यंत महाडीबीटीवर ऑनलाइन स्वीकारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:19 PM2022-01-27T12:19:46+5:302022-01-27T12:22:14+5:30
३१ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने...
पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतरमागास बहुजन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनांचे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने करावेत, असे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभाग या विभागांकडून भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि तसेच निर्वाह भत्ता योजनेचे लाभ देण्यात येतात. त्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने तसेच ऑफलाइन (विहित नमुन्यातील लिखित अर्ज) पद्धतीने महाविद्यालयाकडे अर्ज जमा करावेत.