शाळेची घंटा वाजली! औक्षण करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 08:05 AM2022-06-15T08:05:28+5:302022-06-15T10:05:10+5:30
शाळेचा पहिला दिवस....
पुणे: विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काढलेली सुबक रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट, फलकावर लिहिलेला स्वागतपूर्ण संदेश अशा वातावरणात वडगाव बुद्रुक येथील ज्ञानसाधना विद्यामंदिर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत केले.
आज पुण्यातील सर्व शाळांची घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण होते. गणवेशात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत कुठे फुल देऊन तर कुठे औक्षण करून केले जात होते. शाळांच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
वडगाव बुद्रुक येथील ज्ञानसाधना विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व प्रशासक अनिल चौधरी, शिक्षिका सुनीता गिरी, मनीषा ठाकर, नम्रता भोंग, कावेरी आजबे, संगीता ठाणेकर, रुपाली ढेरे, लीना जाधव उपस्थित होते, गीता पाटील यांनी मुलांचे औक्षण करून त्यांना शाळेत घेतले. यावेळी सरस्वती पूजन करण्यात आले.