बाल्कनीत भरते पक्ष्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:12+5:302021-04-24T04:10:12+5:30
तेव्हा दररोजच्या खाण्या-पिण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे त्यांच्या बाल्कनीमध्ये येत असतात. हे दृश्य पाहून पासलकरांचा बाल्कनीमध्ये जणू पक्ष्यांची शाळाच ...
तेव्हा दररोजच्या खाण्या-पिण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे त्यांच्या बाल्कनीमध्ये येत असतात. हे दृश्य पाहून पासलकरांचा बाल्कनीमध्ये जणू पक्ष्यांची शाळाच भरती आहे असे वाटते.
कर्वेनगर येथे वास्तव्य करणाऱ्या पासलकर कुटुंबीयांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अनेक महिन्यांपासून पक्ष्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केलेली आहे. तेव्हा या ठिकाणी खाण्या-पिण्यासाठी दररोज नित्यनेमाने अनेक पक्ष्यांची रेलचेल सुरू असते. यामध्ये या पक्ष्यांमध्ये पोपट, बुलबुल, दयाळ पक्षी, ब्राह्मणी मैना, हमिंग बर्ड, चिमण्या, ग्रे बॅब्लर व खारुताई असे असंख्य पक्षी दररोज येत असतात. तसेच या पक्ष्यांना आपलेसे वाटावे यासाठी त्यांनी बाल्कनीमध्ये फुलझाडे लावून नैसर्गिक वातावरण देखील तयार केले आहे.
तर पक्ष्यांना बसण्यासाठी छोटी छोटी घरे देखील ठेवली आहेत. त्यामुळे या पक्ष्यांचा वावर सहजरित्या या ठिकाणी होत असतो. तसेच या पक्ष्यांना खायला यांच्याकडून तांदूळ, शेंगदाणे व वेगवेगळ्या प्रकारांचे धान्य दररोज ठेवले जाते. पिण्यासाठी बाल्कनीतच पाण्याची व्यवस्था केलेली आहे. बरेचसे पक्षी त्या पाण्यात अंघोळीचा मनमुराद आनंद सुद्धा घेतात. सध्य परिस्थितीमध्ये या ठिकाणी पक्ष्यांचा वावर एवढा वाढला आहे की, आमची सकाळ या पक्ष्यांच्या चिवचिवाटाने सुरू होते अशी माहिती दिलीप पासलकर यांनी दिली तसेच हे सर्व पक्षी जणू काही त्यांच्या कुटुंबातील सदस्य झालेले आहेत असेच वावरतात तसेच त्यांच्या हातून पोपट शेंगदाणे,पेरू खातात. या कुटुंबाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन देत राबविलेल्या या उपक्रमातून आजूबाजूच्या अनेक लोकांनी ही प्रेरणा घेऊन पक्ष्यांना खायला व प्यायला पाणी ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या परिसरात सकाळ-संध्याकाळ पक्षांचा चिवचिवाट चांगलाच वाढला आहे.
फोटो ओळ : पासलकर कुटुंबीयाच्या बाल्कनीमध्ये धान्य खाण्यासाठी जमलेले पक्षी आलेल्या पक्ष्यांना धान्य भरविताना.