स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:37+5:302021-05-20T04:11:37+5:30
आयुष्यातला सर्वात कठीण काळ, स्कुल बस चालकांनी मांडली व्यथा पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद.परिणामी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ...
आयुष्यातला सर्वात कठीण काळ, स्कुल बस चालकांनी मांडली व्यथा
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद.परिणामी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस,व्हॅन, रिक्षा या देखील बंद झाल्या.14 महिन्यापासून स्कुल बस चालक आपल्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ असून, रोजचा दिवस काढणे मुश्किल झाले आहे. घर चालविण्यासाठी कुणी भाजीपाला विकतो तर कुणी मोल मजुरी करतो तर काही जण दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत आहे. स्कुल बस बंद मात्र जीवनाचा हा गाडा ओढण्यासाठी रोजचाच आता संघर्ष सुरू असल्याची भावना स्कुल बस चालकांनी व्यक्त केली.
गेल्या 14 महिन्यापासून शहराच्या विविध भागांत स्कुल व्हॅन, बस बंद अव्यस्थेत धूळखात उभी आहे. अजून किती दिवस गाडया बंद राहतील हे निश्चित आताच सांगता येणार नाही. कुटुंब चालविण्यासाठी अनंत अडचणी येत असल्याचे ते सांगतात. बँकेचे हप्ते थकले, विमा संपला, होती न्हवती तेवढी जमा पुंजी संपली. काहींनी पर्याय म्हणून दुसऱ्या व्ययसायाकडे वळले तर काहीनी दुसऱ्या व्यवसायत देखील तोटा झाला म्हणून तो व्यवसाय देखील बंद केला.
ृृृृृृृृृृृृृृृृ----------------
पालकांकडुन मदतीची अपेक्षा
गेल्या अनेक वर्षांपासून मी विद्यार्थी वाहतूक करीत आहे. 14 महिन्यापासून गाडी बंद असल्याने सुरुवातीला रिक्षा चालविली.मात्र त्यात देखील घर चालविणे अवघड झाले.कधी शंभर रुपये मिळायचे तर कधी दोनशे. त्यामुळे हा देखील व्यवसाय बंद करावा लागला. आता ज्यांना चालकाची गरज आहे त्याच्याकडे चालक म्हनून काम करतो.या कठीण काळात विद्यार्थ्यांच्या पालकांनी थोडी तरी मदत करायला हवी होती.
- नितीन ढोले, व्हॅन चालक
..........
गेल्या 22 वर्षांपासून या व्यवसायात आहे. वाहन चालविण्याशिवाय दुसरे काही येत नाही.घर चालविण्यासाठी भाजीपाला विकला. मात्र त्यात ही फारसे यश आले नाही.आता घरीच आहे. कामाच्या शोधात आहे. सरकारी मदतीची आशा आहे.
प्रवीण औसेकर, स्कुल बस चालक
........
गेल्या 10 वर्षा पासून हा व्यवसाय करीत आहे. घरी आई वडील, पत्नी व दोन मुलं आहेत. रिक्षाचा व्यवसाय केला पण तो चालला नाही. आता घरीच आहे.थोडी जमापुंजी आहे त्यावरच घर काटकसर करून चालवावे लागत आहे. सरकारने टॅक्स तरी रद्द करावा ही मागणी आहे.
संदीप काकडे , स्कुल व्हॅन चालक
......
3 वर्षा पासून या व्यवसायात आहे. वडिलांचे लिंबू विकण्याचा व्यवसाय आहे.त्यात आता मी ही मदत करतो आहे. मागील 14 महिन्यापासून वाहतूक बंद असल्याने खूप हाल होत आहे.सरकारने आम्हाला देखील विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे.
-रवी नांगरे , स्कुल व्हॅन चालक
......
- गेल्या आठ वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. या 14 महिन्यात अनेक कामे केली. पण त्यात यश मिळाले नाही. मग आता मोठ्या भावाचा पावडर कोटीग चा व्यवसाय आहे. तोच आता करतोय . कसंबसं घर चालत आहे.
संदीप कामठे , स्कुल बस चालक
.....
कोट 1 स्कुल बस चालकांना मोठया अडचणीच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागत आहे. कुणी आंबे विकत आहे तर कुणी मिळेल ते काम करीत आहे. शाळा सुरू झालं म्हणजे यांच्या अडचणी संपल्या असे नाही. कारण 14 महिने वाहन बंद आहे.ते सुरू करणे देखील मोठी खर्चिक बाब आहे. शासनाने या घटकांचा देखील विचार करणे गरजेचे होते.
बापू भावे, पुणे शहर व पिंपरी चिंचवड विद्यार्थी वाहतूक संघ,अध्यक्ष, पुणे.
........................
आकडेवारी -----------
स्कुल बस संख्या : 19,400 (पुणे व पिंपरी)
स्कुल बस चालक : 20 ते 22 हजार
विद्यार्थी वाहतूक संख्या : 5 लाख