शालेय मित्रानेच घातला १० लाख रुपयांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:17 AM2021-02-28T04:17:35+5:302021-02-28T04:17:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या २० वर्षांपासून शाळेपासून मैत्री असलेल्या मित्राला कापड व्यवसाय करण्यासाठी त्याने १० लाख रुपये ...

A school friend paid Rs 10 lakh | शालेय मित्रानेच घातला १० लाख रुपयांना गंडा

शालेय मित्रानेच घातला १० लाख रुपयांना गंडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या २० वर्षांपासून शाळेपासून मैत्री असलेल्या मित्राला कापड व्यवसाय करण्यासाठी त्याने १० लाख रुपये दिले. पण वर्षाची मुदत उलटून गेल्यानंतरही पैसे परत केले नाहीत. उलट पैसे मागितले, तर ते परत न करता धमकी देऊन फसवणूक केली. त्यामुळे ‘दोस्त दोस्त ना राहा’ असे म्हणण्याची पाळी त्या मदत करणाऱ्या मित्रावर आली आहे.

याप्रकरणी अमित कांबळे (वय ३९, रा. न-हे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरून रामचंद्र मारुती नाईक (रा. बर्गेमळा, इचलकरंजी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कांबळे आणि नाईक हे गेले २० वर्षांपासून एकमेकांना ओळख असून शाळेपासून त्यांची मैत्री आहे. नाईक याला कापड व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्याने २०१६ मध्ये १० लाख रुपयांची कांबळेकडे मागणी केली होती. ते पैसे एक वर्षाच्या मुदतीत परत करण्याचे आश्वासन नाईक याने दिले होते. त्यानुसार कांबळे यांनी त्याला १० लाख रुपये दिले होते. वर्षभराची मुदत संपल्यानंतर कांबळे यांनी नाईककडे पैशाची मागणी केल्यावर त्याने लवकरात लवकर देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने पैसे देण्याची टाळाटाळ करणे सुरू केले. वारंवार मागणी केल्यावर तो शिवीगाळ करू लागला. त्याने कांबळे यांना धमकी दिली. शेवटी कांबळे यांनी पैशाचा अपहार केल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली आहे.

Web Title: A school friend paid Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.