Pune News| लोहगावात डंपरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 15:31 IST2022-09-06T15:29:36+5:302022-09-06T15:31:51+5:30
लाेहगावात पठारे वस्तीतील एम जी ब्रिलिएंट शाळेजवळ ही दुर्घटना घडली...

Pune News| लोहगावात डंपरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू
पुणे : भरधाव डंपरची धडक बसल्याने सायकलवरून क्लासला जाणाऱ्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. लाेहगावात पठारे वस्तीतील एम जी ब्रिलिएंट शाळेजवळ ही दुर्घटना घडली. रोशन बाबा अंगरखे (वय १६, रा. शौर्या पार्क, पठारे वस्ती, लोहगाव) असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे.
याप्रकरणी तिचे वडील बाबा पंढरीनाथ अंगरखे (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, रोशनी अंगरखे ही सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सायकलवरून क्लासला जात होती. पठारे वस्तीतील एम जी ब्रिलिएंट शाळेजवळ भरधाव डंपरची धडक लागल्याने डंपरच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असून, विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.