शाळेच्या आवारात भरतो मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:52+5:302021-07-08T04:09:52+5:30

-- खोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या बंदचा फायदा सध्या माद्यपींना होताना ...

The school grounds are full of alcoholics | शाळेच्या आवारात भरतो मद्यपींचा अड्डा

शाळेच्या आवारात भरतो मद्यपींचा अड्डा

Next

--

खोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या बंदचा फायदा सध्या माद्यपींना होताना दिसत आहे. शाळा बंद असल्याने शाळेच्या आवारात व गार्डनमध्ये चक्क दारूच्या बाटल्या, ग्लास, सिगारेट पाकिटे, गुटख्याच्या पुड्या सापडल्या गेल्या असल्याची माहिती श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. लोणकर यांनी दिली आहे.

शाळा हे विद्येचे मंदिर मानले जाते. मात्र, दारुड्यांनी अशा पवित्र ठिकाणला अड्डा बनविला आहे. शाळा बंद असल्याचा फायदा घेत शाळेच्या आवारात दारू पिणे, सिगारेट ओढणे, गुटखा खाणे हे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, सिगारेटचे थोटके यांचा खच पडला आहे. शाळेच्या फरशीवर व भिंतीवर गुटखा खाऊन थुंकले आहे.

शाळेचे शिपाई रोज शाळेच्या आवारातील बाटल्या, सिगारेट पाकिटे उचलून टाकत आहेत. ही बाब शाळेच्या शिपायांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली असून याबाबत मुख्याध्यापकांनी खोर ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. वेळीच ग्रामपंचायतीने कठोर पाऊल उचलून या गर्दुल्यांवर कारवाई केली नाही तर शाळेचे रुपांतर दारुच्या अड्ड्यात झाल्याशिवाय राहणार नाही व येथे मुलांना येणे कठीण होणार असल्याची भीती मुख्याध्यापक लोणकर यांनी व्यक्त केली.

-

फोटो क्रमांक : ०७ खोर

फोटोओळ : खोर येथील श्री भैरवनाथ विद्यालयाच्या आवारात सापडलेल्या दारूच्या बाटल्या, ग्लास, सिगारेट पाकिटे, गुटख्याच्या पुड्या आदींचा खच.

070721\07pun_18_07072021_6.jpg

फोटोओळ : खोर  येथील श्री भैरवनाथ विद्यालयाच्या आवारात सापडलेल्या दारूच्या बाटल्या, ग्लास, सिगारेट पाकिटे, गुटख्याच्या पुड्या आदींचा खच

Web Title: The school grounds are full of alcoholics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.