शाळा सोडल्याचा दाखला डिजिटल स्वरूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:22+5:302021-02-17T04:15:22+5:30
आंबेठाण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे (ता. खेड) येथील शाळेत आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला ...
आंबेठाण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे (ता. खेड) येथील शाळेत आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आला असून संगणकावर जनरल रजिस्टर नंबर एन्ट्री केल्यास विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रिंट मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे यांनी दिली.
कोरोनाच्या काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे यांनी मिळालेल्या मोकळ्या वेळेचा उपयोग करून शाळेमध्ये आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांचा डाटा एन्ट्री केल्यामुळे हे शक्य झाले आहे. डिजिटल यंत्रणेचा त्यांनी या पद्धतीने उपयोग केल्यामुळे काही क्षणात शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होईल. काळानुसार रजिस्टर खराब झाले हरवले, भिजले हे सांगायला लागणार नाही.
डिजिटल दाखल्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती श्री चांगदेव शिवेकर, गट शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांचेसह मतदारसंघातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शाळा प्रमुख उपस्थित होते.
वराळे शाळेचा डिजिटल शाळा सोडायचा दाखला शुभारंभ