शालेय पोषण आहाराचे बिल रखडले

By admin | Published: March 22, 2017 02:55 AM2017-03-22T02:55:14+5:302017-03-22T02:55:14+5:30

शालेय पोषण आहार योजनेला गतिमान करण्यासाठी व योजना पारदर्शक करण्यासाठी सर्व माहिती आॅनलाइन करायाचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी

School nutrition bill paused | शालेय पोषण आहाराचे बिल रखडले

शालेय पोषण आहाराचे बिल रखडले

Next

पाईट : शालेय पोषण आहार योजनेला गतिमान करण्यासाठी व योजना पारदर्शक करण्यासाठी सर्व माहिती आॅनलाइन करायाचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला आहे. परंतु, बिल जिल्हास्तारावर अदा करावयाचे का, तालुका सरावर याचा निर्णय न झाल्याने शालेय पोषण आहाराचे बिल गेल्या ८ महिन्यांपासून रखडले असून शालेय पोषण आहार बनविणारे मेटाकुटीला आले आहे.
शालेय पोषण आहाराचे बिल आॅगस्ट महिन्यापासुन रखडले आहे. बिल रखडल्याची अनेक कारणे असली तरी शालेय पोषण आहार पुराविनाऱ्या आनेक संस्था व महिला बचत गट अडचणीत आल्या आहेत. शालेय पोषण आहार योजनेमुळे आनेक महिलांना रोजगार मिळाला असला तरी रोजंदारी मिळण्या ऐवजी शाळांना पोषण आहार पुरविणेच अंगलट येत आहे.
या सर्वच संस्थांना पुरक आहार पुरविणे गॅस बिल अदा करणे यामध्येच ना कि नऊ आले असुन शासनाकडून याबाबत त्वरीत हालचाली होणे आपेक्षीत आहे .
खेड तालुक्यामध्ये सध्या ४६५शाळांमधील १ ते ५ पर्यंत ३० हजार दोनशे ६७ विद्यार्थव ६ ते ८ पर्यंत २३ हजार ७४० विद्यार्थी असे एकूण ५४ हजार विद्यार्थ्यांना
रोजचा पोषण आहार काही सामाजिक संस्था माहिला बचत गटामार्फत पुरवित असुन ६ ते ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थांसाठी २ रुपये १७ या प्रमाणे तर १ते ५ वी
पर्यतच्या विद्यार्थांसाठी १ रुपया १७ पैसे प्रमाणे पुरक आहारासाठी बिल मिळत असल्याने रोजचे
लाखो रुपये शासनाकडे होत असुन ८ महिने शासनाचा हा सर्व भार सामाजिक संस्था आर्थिक
ताकद नसताना मजुरीविनाच भार उचलत आहे.
(वार्ताहर)

Web Title: School nutrition bill paused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.