शाळेचे क्रीडांगण की उकिरडा! पालक संतप्त ; संरक्षक भिंतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 11:52 PM2019-02-07T23:52:47+5:302019-02-07T23:53:13+5:30
निमसाखर येथी जिल्हा परीषदेची जुनी प्राथमिक शाळेच्या क्रिंडागणावर सध्या दररोज कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून त्यामुळे हे क्रींडागण आहे की गावचा उकिरडा आहे याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निमसाखर : निमसाखर येथी जिल्हा परीषदेची जुनी प्राथमिक शाळेच्या क्रिंडागणावर सध्या दररोज कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून त्यामुळे हे क्रींडागण आहे की गावचा उकिरडा आहे याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उकिरड्यावरच अनेकजण लघुशंकाही करत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
काही वर्षापूर्वी शाळेत मोठी पटसंख्या होती मात्र इंग्लिश माध्यम व खाजगी शाळा वाढल्यानंतर कल त्या शाळांकडे वळला आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गामद्ये बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी राहिले. त्यामुळे शाळेतला उत्साह कमी झाला आणि शाळेचे मैदानही ओसाड पडायला लागले. शाळेत कमी मुले असल्यामेुळे मैदानावर कुठे येणार त्यामुळे अनेक दिवासांंपासून ओस पडलेल्या या मैदानावर काहींनी थेट केर-कचरा टाकण्यास सुरवात केली. हळूहळू त्याचे ढीग वाढत गेले आणि काही दिवसांमध्ये या मैदानाला उकिरड्याचे स्वरूप आले.
शाळेमध्ये सध्या ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना देखील पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. शाळेच्या स्वच्छता गृहात पाणी नसल्यामुळे त्याची दुरावस्था झाली आहे. या शाळेसाठी गेली अनेक वषार्पासुन शाळेभवती सुरक्षाभिंतीची मागणी केली होती. मात्र संबंधीताकडुन दुर्लक्ष होत आहे. ज्या भागातुन विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात त्या रस्ता भागातच काही मंडळींनी कचरा टाकून उकिरडे तयार केले आहे.
शाळेच्या परिसरात सिसिटिव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाले. सीसीटीव्ही बसविल्याल त्याच्या भितीपोटी कचरा टाकणाºयांवर प्रतिबंधी बसणार आहे. त्यामुळे किमान जिल्हा परिषदेने सीसीटीव्ही मंजूर करावेत अशी मागणी होत आहे.
माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावे
या शाळेमधून शिकेलेल्या विद्यार्थ्यांनी राजकीय, वकीली, डॉक्टर, व्यापार अशा अनेक व्यवसायात उत्तूंग यश मिळविले आहे. त्यांनीच आता शाळेच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यायला हवा असल्याची चर्चा गावात आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार विनंती केल्यानंतरही शाळेला संरक्षण भिंती बांधून दिली जात नाही की विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनीच एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी सुखसोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी कल्पना शिक्षकांमधून पुढे येत आहे.