आरटीईअंतर्गत शाळा नोंदणी शनिवारपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 06:54 AM2018-01-15T06:54:10+5:302018-01-15T06:54:22+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवार,दि. २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवार,दि. २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेशाची पहिली सोडत १४ व १५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये काढली जाणार आहे.
आरटीईअंतर्गत गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमधील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहेत. या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाते. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विलंब टाळण्यासाठी यंदा जानेवारीपासूनच ही प्रक्रिया राबविली जात आहे.
पालकांनी आरटीई प्रवेशासाठी २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करायचे आहेत, प्रवेशाची पहिली सोडत १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत जाहीर केली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी १६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत.
पहिल्या फेरीत ज्या पालकांना अर्ज करता आला नाही, त्यांना अर्ज करण्यासाठी १६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत पुन्हा संधी देण्यात येणार आहे. प्रवेशाची दुसरी सोडत ७ व ८ मार्च या कालावधीत जाहीर केली जाणार आहे. पालकांनी ९ मार्च ते १२ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नव्हते,
त्यांना अर्ज करण्यासाठी ९ मार्च ते २२ मार्च या काळात पुन्हा संधी दिली जाणार आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
१. आरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी - १० जानेवारी ते २० जानेवारी
२. पालकांनी आॅनलाइन अर्ज भरणे - २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी
३. पहिली सोडत काढणे - १४ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारी
४. पालकांनी प्रवेश निश्चित करणे - १६ फेब्रुवारी ते १ मार्च
५. पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - १६ फेब्रुवारी ते ३ मार्च
६. दुसरी सोडत - ७ मार्च व ८ मार्च
७. पालकांनी प्रवेश निश्चित करणे - ९ मार्च ते २१ मार्च
८. पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - ९ मार्च ते २२ मार्च
९. तिसरी सोडत - २६ मार्च व २७ मार्च
आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
रहिवासी पुरावा-आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला), जन्म दाखला, बालकाचे पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र