चिखल तुडवत शाळेला चाललो आम्ही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:27 AM2018-08-15T00:27:00+5:302018-08-15T00:27:16+5:30
भोर शहरालगत असलेल्या किवत गावातील गोसावीवस्तीत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना चिखल तुडवत जावे लागते. या मुलांच्या पालकांनी या वर्षी १५ आॅगस्ट कार्यक्रमाला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
महुडे - भोर शहरालगत असलेल्या किवत गावातील गोसावीवस्तीत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना चिखल तुडवत जावे लागते. या मुलांच्या पालकांनी या वर्षी १५ आॅगस्ट कार्यक्रमाला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाला स्वातंत्र मिळून अनेक वर्षे लोटली, तरी डोंगरी भागातील गोसावीवस्तीतील मुलांना शाळेत जाण्यास साधा रस्ताही नाही. किवत गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. ७० मुले ही गोसावीवस्तीतील आहेत. या मुलांना शाळेत जाण्यास खासगी मालकाच्या जागेतून चिखलातून मार्ग काढत जावे लागते. या भागात पाऊस भरपूर होत असल्यानेही मुले शाळेत जाताना एकमेकांचा हात धरून चिखलातून जातात. प्रसंगी पाय घसरून पडतातही. या समस्येकडे लक्ष देण्यास प्रशासन व लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नाही का? असा सवाल रमेश पवार, रावसाहेब पवार, अमित भामसे, चंद्रकांत चंदनशिव, नितीन पवार, दत्तात्रय चव्हाण, वासुदेव परखादे, अंकुश कुमठे, श्रीदीप कुमठे या स्थानिकांनी केला आहे.