शाळांना मिळाले अनुदान
By admin | Published: December 27, 2015 02:04 AM2015-12-27T02:04:34+5:302015-12-27T02:04:34+5:30
२५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश देऊनही शासन अनुदान देताना हात आखडता घेत असल्याने खासगी शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास उत्सुक नव्हत्या. या शाळांना दिलासा मिळाला
पुणे : २५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश देऊनही शासन अनुदान देताना हात आखडता घेत असल्याने खासगी शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास उत्सुक नव्हत्या. या शाळांना दिलासा मिळाला असून, ३८ लाख ७१ हजार २०२ रुपयांचे अनुदान नुकतेच वाटप करण्यात आले आहे.
बालकाच्या मोफत व
सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित गटातील बालकांसाठी
२५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक
आहे. सुरुवातीला शाळांनी प्रवेश देण्यास तत्परता दाखवली. मात्र, अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवेश देण्यासाठी शाळा टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहतात.
पुणे जिल्हा, शहर व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रवेश दिलेल्या शाळांचे २०१२-१३ पासून अनुदान रखडले होते. २०१२-१३ मध्ये ४३८ विद्यार्थ्यांना, तर २०१३-१४ मधील १ हजार ६८० विद्यार्थ्यांसाठीचे अनुदान या शाळांना मिळाले नव्हते. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे
जुलै महिन्यात तसा प्रस्ताव पाठवून वित्तरेषेप्रमाणे अनुदान
मिळावे, अशी मागणी केली होती.