शाळांनी खाल्ला विद्याथ्र्याचा पोषण आहार
By admin | Published: December 9, 2014 11:25 PM2014-12-09T23:25:54+5:302014-12-09T23:25:54+5:30
शाळांनी नेहमी गैरहजर राहत असलेल्या विद्याथ्र्याचा शालेय पोषाण आहार व शैक्षणिक साहित्य खाल्ले असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे.
Next
पुणो : राज्यातील काही खासगी व विनाअनुदानित शाळांनी नेहमी गैरहजर राहत असलेल्या विद्याथ्र्याचा शालेय पोषाण आहार व शैक्षणिक साहित्य खाल्ले असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे यापुढील काळात सर्व शाळांनी गैरहजर राहत असलेल्या विद्याथ्र्याचे वेगळे हजेरी पत्रक तयार करावे. तसेच, गैरहजर विद्याथ्र्याची नावे हजेरी पत्रकावर लाल पेनाने लिहून ठेवावीत, अशा सूचना राज्यातील सर्व शाळांना दिल्या जाणार आहेत. त्या संदर्भातील आवश्यक प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे सुरू करण्यात आली आहे.
विद्याथ्र्याचा खोटा पट दाखवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणा:या शाळांची माहिती पटपडताळणी मोहिमेतून समोर आली होती.
त्यावर संबंधित शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा केली जाणार होती. परंतु, त्याला न्यायालनाने स्थगिती दिली. परिणामी विद्याथ्र्याची खोटी पटसंख्या दाखवून शासनाचा निधी लाटणा:या शाळांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता गैरहजर विद्याथ्र्याच्या पोषण आहाराचा व शैक्षणिक साहित्याचा अपहार करणा:या शाळांवर कारवाई होणार का? असा प्रश्न शिक्षण विभागातील अधिका:यांकडूनच उपस्थित केला जात आहे.
मुंबई महापालिका कार्यक्षेत्रतील विद्याथ्र्याना पालिकेतर्फे गणवेश, टाय, बूट, स्वेटर, छत्री, कंपासपेटी अशा एकूण 27 वस्तूंचे वाटप केले जाते. परंतु, शाळांकडून गैरहजर विद्याथ्र्याचे साहित्य घेतले जाते.
त्यामुळे शाळा तपासणीसाठी जाणा:या शिक्षणाधिका:यांनी संबंधित शाळेतील गैरहजर विद्यार्थाची तपासणी करावी. तसेच, यापुढील काळात गैरहजर विद्याथ्र्याची माहिती घेऊनच सर्व शाळांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि शालेय पोषण आहाराच्या खर्चाचे वितरण करावे, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
(प्रतिनिधी)
4राज्यातील शाळांना शालेय पोषण आहारासह विविध प्रकारचे
मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाते. त्यामुळे सध्या अनेक खासगी व विनाअनुदानित शाळांना हजेरी पटावर असणा:या विद्यार्थाच्या संख्येनुसार शासनाकडून साहित्याचे वाटप केले जाते आहे. परंतु, शिक्षण हक्क कायद्यानुसार नेहमी गैरहजर राहणा:या कोणत्याही विद्याथ्र्याला शाळेतून काढून टाकता येत नाही.
4त्यामुळे सर्वच शाळांमध्ये अनेक शालाबाह्य मुलांची नावे नोंदविली गेली आहे. मात्र, सर्वच शालाबाह्य मुले नियमितपणो शाळेत येत नाहीत. त्यातील काही मुले वर्षानुवर्षे शाळेत येत नाहीत. तरीही संबंधित विद्याथ्र्याचा पोषण आहाराचा खर्च आणि त्यांच्या वाटय़ाचे शैक्षणिक साहित्य शाळा घेत आहेत.
4परिणामी, शासनाची फसवणूक होत आहे.त्यामुळे शिक्षण
विभागाने गैरहजर विद्याथ्र्याचे वेगळे हजेरी पत्रक तयार
करण्याचा मार्ग काढला आहे.
गैरहजर विद्याथ्र्यासाठी वेगळे हजेरी पत्रक किंवा त्यांची नावे मस्टरच्या शेवटी लाल पेनाने लिहून ठेवावीत, अशा सूचना राज्यातील सर्व शाळांना कराव्यात, असा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आह
- गोविंद नांदेडे,
राज्याचे प्राथमिक शिक्षण सहसंचालक