शाळांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेत्तर अनुदान मिळावे: कोलते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:12 AM2021-09-14T04:12:52+5:302021-09-14T04:12:52+5:30
संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण संस्थेची पुण्यात बैठक पार पडली. त्या वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह माजी ...
संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण संस्थेची पुण्यात बैठक पार पडली. त्या वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे यांनी मांडलेल्या या ठरावाला संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील व सतीश खोमणे यांनी अनुमोदन दिले. बैठकीनंतर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार विजय गव्हाणे, राज्य महामंडळाचे पुणे विभागीय अध्यक्ष आप्पासाहेब बालवडकर, संस्थाचालक शिक्षण मंडळाचे सचिव शिवाजी घोगरे, खजिनदार श्रीप्रकाश बोरा, सहसचिव महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ उपस्थित होते.
२० टक्के अनुदानाच्या शाळा ४० टक्के अनुदानावर गेल्या आहेत. परंतु ४० टक्के अनुदान मिळण्यापूर्वीच या शाळांचे पूर्वीचे २० टक्के अनुदान बंद करण्यात आले आहे. हा अन्याय त्वरित दूर करण्याची मागणी शिक्षण आयुक्त यांनी मान्य केले. शासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू, असे सोळंकी यांनी सांगितले. संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या या बैठकीत संस्थेचे स्वीकृत सदस्य म्हणून भीमाशंकर शिक्षण संस्था, पारगावचे खजिनदार, प्रदीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली. या बैठकीत वि.ल. पाटील, शांताराम पोमण, जयसिंग काळे, वीरसिंह रणसिंग, प्राचार्य प्रसन्न देशमुख उपस्थित होते.