शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली, काळजावर दगड ठेवून बाळाची पाठवणी ( डमी 938)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:40+5:302021-07-18T04:08:40+5:30

पुणे : ‘‘कोरोना अजूनही संपलेला नाही, या स्थितीत लेकरू दीड वर्षांनी शाळेत जातंय... आईचं काळीज आहे. थोडी काळजी ...

The school's 'third bell' rings, sending the baby with a stone on his heart (dummy 938) | शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली, काळजावर दगड ठेवून बाळाची पाठवणी ( डमी 938)

शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली, काळजावर दगड ठेवून बाळाची पाठवणी ( डमी 938)

googlenewsNext

पुणे : ‘‘कोरोना अजूनही संपलेला नाही, या स्थितीत लेकरू दीड वर्षांनी शाळेत जातंय... आईचं काळीज आहे. थोडी काळजी वाटणारंच! जसा त्याला शाळेत जाताना डबा आणि पाण्याची बाटली देतो. तसेच आता मास्क आणि सॅनिटायझर पण दप्तरात ठेवावे लागते. रोज शाळेत जाताना काय कर, काय करू नको, याच्या सूचना देते. मूल थोडे वैतागते, पण काय करणार आईचं मन आहे. तो शाळेतून घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो, ही एका आईची हृदयस्पर्शी भावना. आज हीच अवस्था मुलाला शाळेत पाठविणा-या प्रत्येक माऊलीची झाली आहे. तब्बल दीड वर्षानी शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली आहे. मुलांमध्ये उत्साह, मित्रमैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता, मस्ती अशी सुखद भावना असली तरी आयांची काळजी मात्र वाढलेली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजूनही राज्यातील बहुतांश शाळा बंद आहेत. काही पालकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला असला तरी ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली आहे, त्या मुलांच्या आयांच्या चिंतेत भर पडली आहे. आॅनलाईन शिक्षणाला मुले कंटाळली आहेत. या शिक्षणामुळे एका जागी तासन् तास बसून राहणे, वाढती स्थूलता, चिडचिड तसेच विषयांचे आकलन न होणे, क्लास सुरू असताना मुलांचे गेम खेळणे या सर्व गोष्टी घडत असल्याचे दिसून आले. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाल्यांच्या आयांकडून सांगण्यात आले आहे. मुलांना शाळेत पाठविण्यामुळे ते खूप खूष झाले आहेत. मात्र सातत्याने कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जात असल्याने थोडी भीतीदेखील आहेच. पण, असे किती दिवस मुलांना घरात बसवून ठेवणार? मुलांना घरात कोंडून ठेवल्यासारखे वाटत असल्याने थोडी रिस्क पत्करून आम्ही मुलांना शाळेत पाठवित आहोत, असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद केल्या होत्या, त्यामुळे मुलांना घरूनच आॅनलाईन अभ्यास करावा लागत होता. परंतु सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आॅनलाईन अभ्यासाला मुले कंटाळून गेली होती. सतत मोबाईल बघून डोळ्यांना त्रास होत होता. माझा मुलगा वेदांत हा इयत्ता आठवीत जात असताना त्याला मास्क,सॅनिटाझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्यात सांगण्यात येत आहे. घरी आल्यावर मुलांना स्वच्छ हातपाय धुवूनच घरात घेतो.

- सुरेखा कचर कडूसकर, कोरेगाव खुर्द, ता. खेड

----------------------------

चौकट

पुणे जिल्ह्यात एकूण शाळांची संख्या : 982

पालकांनी संमती दिलेल्या शाळांची संख्या : 233

सुरू झालेल्या माध्यमिक शाळा : 103

इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या : 2 लाख 37 हजार 917

---------------------------------------------------------------------------------

मुलांनी शाळेत आणि शाळेतून आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

* शाळेत गेल्यानंतर एका बाकावर एकच विद्यार्थ्याने बसावे.

* शाळेच्या सुट्टीत डबा खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

* फिजिकल डिस्टंसिंग पाळावे आणि मास्क वापरावा.

* शाळेतून घरी गेल्यावर मास्क, कपडे गरम पाण्यात धुवावेत

* मुलांनी स्वच्छ अंघोळ करावी.

* मुलाला सर्दी, खोकला असेल तर शाळेत पाठवू नये.

-------------------------------

Web Title: The school's 'third bell' rings, sending the baby with a stone on his heart (dummy 938)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.