शाळा भरणार सकाळी
By admin | Published: March 31, 2017 02:19 AM2017-03-31T02:19:24+5:302017-03-31T02:19:24+5:30
१ एप्रिलपासून उन्हाळी वातावरणामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत सकाळी
राजेगाव : १ एप्रिलपासून उन्हाळी वातावरणामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत सकाळी शाळा भरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी नुकतेच एका परिपत्रकानुसार हे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांना शिकविण्याचे तास दररोज चार तासांहून कमी असू नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागात यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भयंकर उकाडा जाणवत आहे. चाळीसीच्या पुढे उन्हाचा पारा चढलेला आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावालाच पाणी पिण्यासाठी नसल्याने काही शाळेत फेब्रुवारी पासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा उष्णतेचा पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळे १ मार्च पासून पुणे जिल्हयातील शाळा सकाळी सूरू कराव्यात यासाठी सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे दरवर्षी प्रमाणे यंदाही पाठपुरावा केला होता. परंतु प्रशासनाने होकार न दिल्याने पुणे जिल्ह्यात १ मार्च पासून सकाळची शाळा सुरू झाली नाही. दरम्यान पुणे जिल्ह्णाच्या सिमेवर असणाऱ्या सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात मात्र १ मार्च पासूनच सकाळी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात १ मार्चपासून सकाळची शाळा सुरू करण्यासाठी सर्वच संघटनांनी पाठपुरावा केला होता . परंतु सकाळी ७ ते ११ या मर्यादित वेळेत आठवड्याच्या ४५ तासिका भरत नाहीत. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारी गरीब, मजूर, शेतकरी, कामगारांची मुले दिवसभर शाळेत बसली तर त्यांचे कडक उन्हापासून संरक्षण होऊ शकते. अशी भुमिका िप्रशासनाने घेत १ एप्रिलाच सकाळची शाळा होईल, असे सांगितले होते.