शाळांच्या मोकळ्या ‘खोल्या’ अंगणवाड्यांना देणार

By admin | Published: February 25, 2015 11:23 PM2015-02-25T23:23:01+5:302015-02-25T23:23:01+5:30

जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा तत्काळ सर्व्हे करून तेथे जास्तीत जास्त अंगणवाड्यांची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले जाईल,

The schools will have open rooms for the anganwadis | शाळांच्या मोकळ्या ‘खोल्या’ अंगणवाड्यांना देणार

शाळांच्या मोकळ्या ‘खोल्या’ अंगणवाड्यांना देणार

Next

पुणे : जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा तत्काळ सर्व्हे करून तेथे जास्तीत जास्त अंगणवाड्यांची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील ४,५७० अंगणवाड्यांपैकी २,२३९ ठिकाणी इमारती नाहीत. येथील शाळा या समाजमंदिर, खासगी शाळा, मंदिर, ग्रामपंचायत व इतर ठिकाणी भरत असल्याचे वृत्त लोकमतने २५ फेबु्रवारी रोजी प्रसिद्ध केले.
याची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली आहे.
२०१० पासून आतापर्यंत अंगणवाड्यांसाठी ४,७६९.९३ लाख इतका निधी मिळाला आहे. त्यातील ४,३४९.९३ लाख इतका निधी खर्च झाला असून, ९२६ इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत. ३८७ इमारतींची कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजनेअंतर्गत आतापर्यंत निधी मिळाला आहे.
२०१५-१६साठी १६ कोटी ५० लाखांची मागणी जिल्हा
परिषदेतर्फे जिल्हा नियोजनकडे केली आहे. मात्र, या निधीत साधारण २५०च्या आसपास आणखी इमारती होऊ शकतात; मात्र हे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे पुढील नियोजनात यात लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेऊन तसेच स्वत: जिल्हा परिषदही निधी टाकले, असे उमाप यांनी सांगितले.
महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी सांगितले, की जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘आयडल रूम’ (मोकळी जागा) बहुतांश शाळांत उपलब्ध आहेत.
यासाठी बालविकास
प्रकल्प अधिकाऱ्याना शाळांमध्ये अशा मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करण्याच्या तत्काळ सूचना देणार
आहोत. सर्वेक्षणात जिल्हा परिषद शाळांत अशा किती जागा उपलब्ध आहेत? किती वापरण्याजोग्या आहेत? जिथे दुरुस्तीची गरज आहे तिथे तत्काळ दुरुस्ती करून इमारत नसलेल्या व इतर ठिकाणी भरणाऱ्या आंगणवाड्यांना तेथे लगेच हलवू. (प्रतिनिधी)

Web Title: The schools will have open rooms for the anganwadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.